अ‍ॅपशहर

'घुंगट की आड से...', जुही चावलाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान गाणं गाणाऱ्या व्यक्तीवर न्यायालय वैतागलं

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने भारतात सुरू होणाऱ्या ५ जी तंत्रज्ञानाच्या परीक्षणाला विरोध म्हणून न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. नुकतीच या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. परंतु, एका व्यक्तीने चक्क सुनावणीदरम्यान जुहीच्या चित्रपटातील गाणं गायलं.

Lipi 3 Jun 2021, 3:55 pm
मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने ५ जी तंत्रज्ञानामुळे होणारे दुष्परिणाम दाखवून देत या तंत्रज्ञानाच्या परीक्षणाला विरोध करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. ५ जी लागू केल्यास आर्टिकल १४ चं उल्लंघन होत असल्याने ५ जी रद्द करण्यात यावं, अशी भूमिका जुहीने न्यायालयासमोर मांडली आहे. नुकतीच या याचिकेवरील सुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. परंतु, या सुनावणीदरम्यान मीटिंगमध्ये उपस्थित एका व्यक्तीने जुहीच्या हिट चित्रपटातील लोकप्रिय गाणी गाऊन न्यायालयाला भंडावून सोडलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम man sing songs during hearing of 5g testing plea by juhi chawala
'घुंगट की आड से...', जुही चावलाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान गाणं गाणाऱ्या व्यक्तीवर न्यायालय वैतागलं


मुंबई सोडून गावच्या निसर्गात रमली सुपरस्टार अभिनेत्री, आमराईचे फोटो व्हायरल
View this post on Instagram A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

त्याचं झालं असं की याचिकेवर सुनावणी होत असताना मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीने अचानक जुहीच्या चित्रपटातील गाणं गायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने 'लाल लाल होठों पे गोरी किसका नाम है...' हे गाणं गायलं. त्यामुळे न्यायालयाला कामकाज थांबवून त्याला बाहेर करावं लागलं. व्यक्तीला ऑनलाइन सुरू असलेल्या मीटिंगमधून काढून टाकल्यावर न्यायालयाने सुनावणी पुन्हा सुरू केली. तर काही वेळाने तो व्यक्ती पुन्हा मिटिंगमध्ये आला आणि त्याने जुही मॅडम कुठे दिसत नाहीयेत? जुही मॅडम कुठे आहेत? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने पुन्हा 'घुंगट की आड से दिलबर का..' हे गाणं गायलं. यानंतर मात्र न्यायाधीश वैतागले आणि त्याला पुन्हा मीटिंगमधून काढून टाकण्यात आलं.

View this post on Instagram A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तो व्यक्ती तिसऱ्यांदा मीटिंगमध्ये सहभागी झाला आणि यावेळेस त्याने 'मेरी बन्नो की आएगी बारात...' हे गाणं गायलं. हा व्यक्ती वकील किंवा पत्रकार नव्हता, फक्त सुनावणी दरम्यान अडथळा यावा यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे न्यायालयाने अखेरीस त्याच्याविरुद्ध नोटीस काढत पोलिसांना त्या व्यक्तीला शोधून अटक करण्याचे आदेश दिले. परंतु, या संपूर्ण प्रकारामुळे न्यायाधीश आणि इतर व्यक्ती प्रचंड वैतागलेले पाहायला मिळाले.

'...अशा घटनांमुळे प्रेम आणि लग्नावरचा विश्वासच उडालाय'

महत्वाचे लेख