अ‍ॅपशहर

'रॅंबो'मधून टायगरला चित्रपटातून काढल्यानंतर 'या' अभिनेत्याची लागली वर्णी

टायगर श्रॉफ याने नृत्यकौशल्य आणि अक्शनमध्ये असलेली त्याची निपुणता या गुणांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच स्वःताचे असे स्थान आणि चाहतावर्ग निर्माण केला आहे. बॉलिवूडमधील सर्वात व्यग्र असा हा अभिनेता आहे.

हायलाइट्स:

रॅंबो सिनेमातून टायगर श्रॉफ बाहेर

टायगरच्या व्यग्रतेमुळे चित्रिकरण रखडले

टायगरच्या जागी प्रभासची वर्णी लागणार?
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम टायगर
मुंबई ः अभिनेता टायगर श्रॉफ याने आपले नृत्यकौशल्य आणि अॅक्शनच्या जोरावर अगदी कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील सर्वात व्यग्र असलेला अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. आजमितीला टायगर श्रॉफकडे मोठ्या बॅनरेचे सिनेमे असून आणखी काही सिनेमांच्या ऑफर त्याच्याकडे आहेत. परंतु त्याच्याकडे तारखाच नसल्याने काही मोठे सिनेमे त्याला नाईलाजाने सोडावे लागत आहेत.
एकाचवेळी टायगर अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत असल्याने त्याच्याकडे तारखाच शिल्लक नाहीत. या कारणामुळे टायगरची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित 'रॅंबो' सिनेमाचे चित्रिकरण सुरूच होऊ शकलेले नाही. सध्या टायगर 'अॅक्टर वॉर २','बागी ४', 'हीरोपंती २' या अॅक्शनपटांच्या चित्रिकरणात खूपच व्यग्र आहे. आणि 'रॅंंबो' हा देखील अॅक्शनपटच असल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टायगरकडे या सिनेमासाठी तारखाच नसल्यामुळे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्याला काढण्याचा निर्णय घेतला आहे.

टायगरच्या जागी प्रभास




'रॅबो' या सिनेमातून टायगरला काढल्यानंतर सिद्धार्थ आनंद यांनी बाहुबली फेम प्रभास याला घेतल्याचे कळते. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रॅंबो या सिनेमात दाक्षिणात्या सिनेस्टार प्रभास दिसणार असल्याचे वृत्त दिले आहे. अॅक्शनपटांमध्ये प्रभासला बघणे ही त्याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. दरम्यान, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु प्रभास आणि निर्मात्यांमधील बोलणी अंतीम टप्प्यात आली असून लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल. या सिनेमाची स्टोरी प्रभासलाही आवडली असल्याचे समजते.

प्रभासकडे असलेले सिनेमे

प्रभासच्या आगामी 'राधेश्याम' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या वर्षाअखेरीस हा सिनेमा प्रदर्शित होईल. त्याशिवाय प्रभासकडे मेगाबजेट सिनेमा 'आदिपुरुष' असून त्यात त्याने रामाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचीही जोरदार चर्चा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज