अ‍ॅपशहर

नाचण्यापेक्षा धैर्य महत्त्वाचं! नच बलिएला नकार देत राहुल वैद्यची 'खतरों के खिलाडी'मध्ये एण्ट्री

बिग बॉस १४ चा उपविजेता राहुल वैद्यची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. नुकतंच त्यानं दिशा परमारशी लवकरच लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता त्यानं 'खतरों के खिलाडी' शोसाठी होकार दिल्याचं सांगितलं आहे.

Lipi 10 Apr 2021, 7:18 pm
मुंबई: टीव्ही वरील लोप्रिय शो बिग बॉसचा उपविजेता राहुल वैद्य हा शो संपल्यानंतरही सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून राहुल आणि दिशा परमार यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. अशात आता राहुल बद्दल काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राहुलनं रिअलिटी शो 'नच बलिए'ची ऑफर नाकारत 'खतरों के खिलाडी' मध्ये एंट्री करायचं ठरवलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul vaidya will participate in khatron ke khiladi rather than nach baliye
नाचण्यापेक्षा धैर्य महत्त्वाचं! नच बलिएला नकार देत राहुल वैद्यची 'खतरों के खिलाडी'मध्ये एण्ट्री


रणवीर सिंग जेव्हा मराठीत बायकोची समजूत काढतो, पाहा व्हिडिओ

राहुल वैद्यनं आता त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल निर्णय घेतला आहे. ई-टाइम्स दिलेल्या वृत्तानुसार कलर्स टीव्हीशी प्रामाणिकता दाखवत स्टार प्लसच्या 'नच बलिए' ची ऑफर नाकारत रोहित शेट्टीचा अॅडव्हेंचर रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' साठी होकार दिला आहे.

View this post on Instagram A post shared by Rahul Vaidya 🇮🇳🎤 (@rahulvaidyarkv)

बिग बॉस १४ नंतर राहुल वैद्यशी 'खतरों के खिलाडी' शोसाठी संपर्क करण्यात आला होता. पण आरोग्याशी संबंधित कारणासाठी राहुलनं सुरुवातीला या शोसाठी नकार दिला होता. पण आता राहुल पूर्णपणे फिट असून त्यानं या शोसाठी मेकर्सना होकार कळवला आहे.

View this post on Instagram A post shared by Rahul Vaidya 🇮🇳🎤 (@rahulvaidyarkv)

राहुल आणि दिशा परमार यांनी अलिकडेच चंदीगढमध्ये एका म्युझिकल व्हिडीओसाठी चित्रिकरण केले. हाच म्युझिकल व्हिडीओ आणि त्यातील काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. त्यानंतर राहुलला सातत्याने खरे काय आहे अशी विचारणा करण्यात आली. बराच वेळानंतर राहुलने सांगितले की, 'काही लोक लपूनछपून प्रेम करतात, लग्न करतात. आम्ही मात्र वाजत गाजत आणि मोठ्या दिमाखात लग्न करणार आहोत...'

गाड्यांची तोडफोड करताना दिसला राहुल द्रविड, विराट म्हणाला..

महत्वाचे लेख