अ‍ॅपशहर

महालापेक्षा कमी नाही सोनम कपूरचा दिल्लीतील बंगला, पाहा १७३ कोटींच्या घराचे इनसाइड फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांचा देशाची राजधानी दिल्ली येथे आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल १७३ कोटी रुपये आहे. सोनम आणि आनंदचा हा बंगला कोणत्याही महालापेक्षा कमी नाहीये...

Lipi 3 Jul 2021, 6:31 pm
मुंबई: बॉलिवूडच्या सर्वात स्टायलिश जोडीपैकी एक सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा भारतापासून दूर लंडनमध्ये राहत असले तरीही देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक आलिशान घर आहे. सोनम आनंद यांचं हे दिल्लीतील घर कोणत्याही राजमहालापेक्षा कमी नाही. मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेल्या आनंदचा हा बंगला १७३ कोटी रुपये किंमतीचा असल्याचं बोललं जातं. सध्या सोशल मीडियावर सोनम आणि आनंद यांच्या या आलिशान घराचे इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonam kapoor anand ahuja lavish delhi house is worth rs 173 core see inside photos
महालापेक्षा कमी नाही सोनम कपूरचा दिल्लीतील बंगला, पाहा १७३ कोटींच्या घराचे इनसाइड फोटो


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सोनम- आनंद यांच्या बंगल्याचे हे फोटो पाहिल्यावर कोणालाही वाटेल की, तिच्या या बंगल्याच्या समोर एखादा महालही फिका पडेल. आनंद आहुजा हा प्रसिद्ध गारमेंट एक्सपोर्ट हाऊस 'शाही एक्सपोर्ट्स'चे मालक सुनील आहूजा यांचा मुलगा आहे. सोनम आणि आनंद यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली असून हे दोघंही सध्या लंडन येथे राहत आहेत.



आनंद आहुजाचा हा बंगला दिल्ली येथील पृथ्वीराज रोडवर आहे. हा बंगला आनंदचे आजोबा हरीश आहुजा यांनी २०१५ साली खरेदी केला होता. ३१७० क्वेअरफुटचा हा बंगला प्रसिद्ध 'व्हरायटी बुक डिपो'चे मालक ओम अरोरा यांच्याकडून खरेदी करण्यात आला होता. हा बंगला दिल्लीच्या ज्या भागात आहे त्या भागाला लुटियंस बंगला झोन म्हणून ओळखला जातो. या बंगल्याच्या भोवताली पूर्ण हिरवळ आहे.



आनंदच्या दिल्लीच्या घराचे काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे जे पाहिल्या तुम्हीही 'वाह' असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. सोनमच्या बेडरुमपासून ते बास्केटबॉल कोर्टपर्यंत सर्वच एकदम सुंदर आहे. आनंद आहुजा एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. ज्याच्याकडे केवळ भारतात नाही तर परदेशातही प्रॉपर्टी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज