अ‍ॅपशहर

सोनू सूदचं १०० कोटी रुपयांबाबतचं 'ते' ट्वीट चर्चेत, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

करोना व्हायरसच्या काळात सोनू सूदनं नेहमीच सर्वांना मदत करत आला आहे. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यानं सर्वांना मदत करण्याचं काम चालू ठेवलं होतं. आता या कामाबद्दल सोनू सूदनं एक ट्वीट केलं आहे.

Lipi 28 Apr 2021, 5:01 pm
मुंबई: मागच्या वर्षी करोनाची पहिली लाट आली तेव्हापासून सोनू सूदनं गरजू लोकांची मदत करायला सुरुवात केली होती. मागच्या वर्षी त्यानं अनेक प्रवासी मजूरांना घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती. तर आता करोनाची दुसरी लाट आल्यानंतर तो वैद्यकीय सुविधांची मदत करण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. आपल्या या कामाबाबत एक ट्वीट केलं आहे. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असून सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonu sood said saving lives during the second wave of covid 19 is better than blockbuster movie
सोनू सूदचं १०० कोटी रुपयांबाबतचं 'ते' ट्वीट चर्चेत, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव


सोनू सूदनं नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'मध्यरात्री अनेक कॉल केल्यानंतर जेव्हा गरजू लोकांसाठी बेड, काही लोकांना ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून त्यांचा जीव वाचवतो तेव्हा खरंच हे १०० कोटींच्या चित्रपटात काम करण्यापेक्षा जास्त समाधान देतं. रुग्णालयच्या बाहेर बेडसाठी रांग लागलेली असताना आपण कसं काय झोपू शकतो.'

सोनू सूदचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच करोनाच्या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर सोनू सूद करोना संक्रमित झाला होता. मात्र आठवड्याभरातच त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते.

नुकतंच सोनूनं माहिती दिली आहे की, तो मोफत कोविड मदत करणार आहे. सोशल मीडियावर सोनूनं याची माहिती दिली होती. आपल्या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'तुम्ही आराम करा आणि मला टेस्ट करू द्या HealWell24 आणि Krsnaa Diagnostics Pvt. Ltd. यांच्यासोबत मोफत कोविड मदतीची सुरुवात होत आहे.' यासोबत सोनूनं एक टेम्पलेटसुद्धा शेअर केलं आहे. ज्यात याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सानू सूदच्या या फ्रि कोविड हेल्पमधून लोकांना घरबसल्या मदत मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज