अ‍ॅपशहर

मोडणार होतं सुनिधी चौहानचं दुसरं लग्न, गायिकेने खुलासा करत म्हटलं...

मागील वर्षभर सोशल मीडियावर गायिका सुनिधी चौहानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. काही वृत्तवाहिन्यांच्या मते त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. परंतु, आता स्वतः सुनिधीने तिच्या दुसऱ्या लग्नावर खुलासा केला आहे.

Lipi 23 Apr 2021, 7:52 pm
मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान सोशल मीडियावर चर्चेत आहे. मागील वर्षभर सुनिधीच्या दुसऱ्या लग्नाबद्दलच्या निरनिराळ्या चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर असं म्हटलं गेलं होतं की, सुनिधी आणि तिच्या पतीमध्ये काहीतरी वाद सुरू आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत सुरू नाही. त्यानंतर सुनिधीचा पती हितेन सोनिकने या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. परंतु, स्वतः सुनिधीने याबाबतीत काहीही भाष्य केलं नसल्याने त्यांच्याबद्दलच्या चर्चा सुरूच होत्या. आता मात्र सुनिधीने याविषयावर पूर्णविराम लावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sunidhi chauhan open up about her second marriage with hiten sonik
मोडणार होतं सुनिधी चौहानचं दुसरं लग्न, गायिकेने खुलासा करत म्हटलं...


पवित्रा पुनियाला मिळाली होती न्यूड सीनची ऑफर, पण..

काही दिवसांपूर्वी सुनिधी तिच्या पतीसोबत गोव्याला सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तिथून परत आल्यानंतर त्यांच्यात सगळं काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिधीने म्हटलं, 'आता सगळं काही ठीक आहे. मी आणि हितेन एकत्र राहतोय.' असं म्हणत सुनिधीने तिच्या वैवाहिक आयुष्यावरील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये वाद होत परंतु, आता त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुनिधी आणि हितेन यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. २०१८ साली त्यांना एक गोंडस मुलगा देखील झाला आहे.

दिल्लीमध्ये जन्मलेल्या सुनिधीने २००२ मध्ये कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्न केलं होतं. परंतु, आपापसातील मतभेदांमुळे लग्नाच्या एका वर्षातच ते एकमेकांपासून वेगळे झाले. पहिल्या लग्नाच्या वेळेस सुनिधी फक्त १८ वर्षांची होती. त्यानंतर तिने म्युजिक कम्पोजर असलेल्या हितेन सोबत लग्न केलं. 'धूम मचाले','भूमरो' यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी तिने गायली आहेत. सुनिधी बॉलिवूडमधल्या हिट गायकांमधील एक आहे.

Video- एअरपोर्टवर पापराजींची गर्दी बघून भडकला वरुण धवन

हितेनने समोर येऊन सगळ्या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं
सुनिधीने चर्चांवर दिली नव्हती कोणतीही प्रतिक्रिया
सुनिधीने स्वतःहून केला वैवाहिक जीवनाचा खुलासा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज