अ‍ॅपशहर

शुभमंगल सावधान! थाटामाटात पार पडला सुयश- आयुषीचा विवाह सोहळा, पाहा फोटो

लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांनी जुलै महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आज २१ ऑक्टोबर रोजी त्यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला आहे.

guest PAYAL-SHEKHAR-NAIK | Lipi 22 Oct 2021, 8:42 am
मुंबई- मराठमोळा अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सुयश आणि आयुषी यांचा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला आहे. सुयश आणि आयुषीचे अनेक फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. सुयश आणि आयुषी अखेर विवाहबंधनात अडकल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. चाहते त्यांच्या फोटोंवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सुयश आणि आयुषीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suyash tilak and ayushi bhave wedding photos went viral
शुभमंगल सावधान! थाटामाटात पार पडला सुयश- आयुषीचा विवाह सोहळा, पाहा फोटो


View this post on Instagram A post shared by Celebrity Promoters (@celebrity_promoters)

View this post on Instagram A post shared by Celebrity Promoters (@celebrity_promoters)

माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री असं म्हणत सुयशने आयुषीसोबतच्या साखरपुडाचे फोटो शेअर केले होते. जुलै महिन्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. नुकतंच सुयश आणि आयुषीचं केळवण करण्यात आलं होतं. अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांनी सुयश आणि आयुषीचं केळवण केलं होतं. त्यानंतर हे दोघे लग्न कधी करतात याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. अखेर २१ ऑक्टोबर रोजी सुयश आणि आयुषीने लग्नगाठ बांधली आहे. १९ ऑक्टोबर रोजी त्यांचा मेहंदी आणि हळदीचा समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत.

View this post on Instagram A post shared by मराठी कलाकार विश्व (@marathi_kalakar_vishva_)

हळदी समारंभात सुयशने पांढरा कुर्ता तर आयुषीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या सोहळ्यासाठी काही खास पाहुण्यांनाच आमंत्रित केलं गेलं होतं. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला. यात या दोघांनी किती सांगायचंय मला…, मन धागा धागा रेशमी…यांसारख्या मराठी गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळाला. त्यांच्या नृत्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

View this post on Instagram A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

त्यांच्या लग्नाला नातेवाईक, मित्रमंडळी आणि हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे अशा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. आयुषी ही एक अभिनेत्री असून तिने २०१८ साली श्रावण क्वीनचा किताब मिळवला होता. याच बरोबर ती झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शोमध्ये देखील झळकली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज