अ‍ॅपशहर

'मर्द की बॉडीवाली' म्हणत हिणवणाऱ्यांना तापसी पन्नूचं सणसणीत उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिचा आगामी चित्रपट 'रश्मी रॉकेट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, चित्रपटाच्या ट्रेलरवरून तापसीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तापसीने त्यावर आता उत्तर दिलं आहे.

Lipi 25 Sep 2021, 5:43 pm
मुंबई- आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तापसीचा आगामी चित्रपट 'रश्मी रॉकेट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. परंतु, ट्रेलर पाहून काही नेटकऱ्यांनी तापसीची खिल्ली उडवली. काहींनी तापसीला ट्रान्सजेण्डर म्हटलं तर काहींनी तिला पुरुषासारखी दिसतेस असं म्हटलं. तापसीला अत्यंत वाईट भाषेत ट्रोल केलं गेलं. मात्र आता या ट्रोलर्सना तापसीने सणसणीत उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम taapsi pannu back answers to trollers who trolled her athletic body in movie rashmi rocket
'मर्द की बॉडीवाली' म्हणत हिणवणाऱ्यांना तापसी पन्नूचं सणसणीत उत्तर, तुम्हीही कराल कौतुक


'ओ शेठ' गाण्यावरून नवा वाद, गायकानेच केली गाण्याची चोरी?

तापसी बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसीने एक पोस्ट करत तिला ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंटचे काही स्क्रिनशॉट शेअर केले. ज्यात एका युझरने लिहिलं होतं, 'पुरुषासारखं शरीर आहे तुझं असं म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नको आणि भडकू नको.' आणखी एका युझरने लिहिलेलं, 'ही पुरुषासारखं शरीर असणारी फक्त तापसीचं असू शकते.


दुसऱ्या युझरने लिहिलं, 'पुरुषासारखी दिसतेय. लिंग बदलून घेण्याचा विचार करतेयस का? या संपूर्ण कमेंटवर उत्तर देत तापसीने लिहिलं, 'खूप खूप धन्यवाद. पण अशा अनेक महिला आहेत ज्यांना दररोज अशा गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात ते सुद्धा त्यांचा काहीही दोष नसताना. मी त्या खेळाडू महिलांना सलाम करते ज्या देशासाठी स्वतःला वाहून घेतात.'

महामृत्युंजय मंत्र टॅटू- 'धर्माचा अपमान करण्याएवढी मोठी नाही'

तापसीच्या या उत्तराने अनेकांची बोलती बंद झाली आहे. तापसीचा 'रश्मी रॉकेट' १५ ऑक्टोबर रोजी झी५ वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तापसी एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूची भूमिका साकारत आहे. चित्रपटात देखील खेळाडूंच्या मुली आणि मुलं असण्यावरून करण्यात येणाऱ्या भेदभावावर भाष्य करण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख