मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते आणि तिच्या या फिटनेसची सोशल मीडियावर चर्चा असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी शिल्पा रोज दोन तास योगा करते. इतकेच नाही तर तिने लोकांनीही फिट रहावे, यासाठी त्यांच्यासाठी पॉवर योगा डीव्हीडी लाँच केली आहे. त्यात तिने स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक योगांचे प्रकार दाखवले आहे. शिल्पाच्या फिटनेसचे हे गुण तिच्या मुलामध्ये विआनमध्ये आले आहेत. विआनला देखील योगासनांचे अनेक प्रकार येतात. शिल्पाने विआनचा योगासने करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राजचा नऊ वर्षांचा मुलगा विआन योगासने करताना दिसत आहे. परंतु खास गोष्ट अशी आहे की विआनसोबत त्याची बहिण समिशा देखील योगा शिकताना दिसत आहे. या दोघा भावा-बहिणींचा सुंदर व्हिडिओ शिल्पाने शेअर केला आहे.
शिल्पा म्हणते, 'मला तुमचा अभिमान आहे'
शिल्पाने हा व्हिडिओ शेअर करताना पोस्ट ही लिहिली आहे. शिल्पाने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मुलं ही ओल्या मातीसारखी असतात... आपण त्यांचं आयुष्य सुरुवातीपासून त्याला आकार द्यायला हवा आहे. त्यामध्ये त्यांना योग्य आहार, फिट राहण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावायला हवी. मी देखील विआनसोबत हेच करण्याचा प्रयत्न केला आहे. आता माझी भूमिका विआन साकारत आहे. तो त्याच्या लहान बहिणीला योगा शिकवत आहे. मला तुझा अभिमान आहे. योगासोबत त्या दोघांमध्ये जे छान बाँडिंग आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचे आपापसातील हे नाते माज्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे मी स्वतः फिट आणि स्वस्थ राहते. हे सर्व त्यांच्यासाठी आहे... तुमचा देखील हा आठवडा सुंदर होवो...
शिल्पाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्यावर युझर्स भरभरून लाईक्स आणि कॉमेन्ट करत आहेत. शिल्पाचे चाहते तिच्या मुलांचे भरभरून कौतुक करत आहेत. मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.