अ‍ॅपशहर

Video: हादरवून टाकणारा 'रानबाजार'चा ट्रेलर आला समोर

Raanbaazaar Official Trailer: मराठीतील आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेब सीरिज अशी 'रानबाजार'ची चर्चा आहे. सोशल मीडियावर सीरिजच्या ट्रेलरचीच चर्चा आहे. या बेब सीरिजमध्ये मराठीमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2022, 11:08 am
मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात सध्या चर्चा आहे ती 'रानबाजार' या वेब सीरिजची. या सीरिजचे दोन टिझर नुकतेच प्रदर्शित झाले. ला वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' असंही म्हटलं जातं आहे. या सीरिजमध्ये दिग्गज कलाकारांची फौज असल्यानं उत्सुकता शिगेला गेली आहे. या सीरिजच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raanbaazaar Trailer
'रानबाजार' ट्रेलर


प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा अभिनय असलेले दोन टिझर शेअर केल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती या सीरिजच्या ट्रेलरची. अभिनेत्री उर्मिला कोठारे ,माधुरी पवार,सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, असे आघाडीचे कलाकार सीरिजमध्ये दिसणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज