अ‍ॅपशहर

'तुझ्यामुळे त्यानं कॅच सोडला' जेव्हा क्रिकेट मॅच पाहताना शर्मिला टागोर यांच्यावर भडकले होते वडील

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला अनेकदा विराटच्या खराब क्रिकेट परफॉर्मन्ससाठी पतौडी यांनी एक कॅच सोडल्यानंतर शर्मिला यांचे वडीलच त्यांच्यावर चिडले होते.

Lipi 16 Apr 2021, 11:00 am
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्धणार विराट कोहली जेव्हा मैदानावर चांगलं प्रदर्शन करत नाही त्यावेळी यासाठी नेहमीच अभिनेत्री अनुष्का शर्माला जबाबदार ठरवलं जातं. अनेकदा तिला ही टीका सहन करावी लागली आहे. हे सर्व एकेकाळी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबतही घडलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी अनेक वर्षांनी हे दुःख व्यक्त केलं. जेव्हा त्यांचे पती क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांचं प्रदर्शन जेव्हा चांगलं होत नसे त्यावेळी त्यासाठी शर्मिला यांना जबाबदार ठरावलं जात असे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when sharmila tagore was blamed by her father for tiger pataudi catch drop
'तुझ्यामुळे त्यानं कॅच सोडला' जेव्हा क्रिकेट मॅच पाहताना शर्मिला टागोर यांच्यावर भडकले होते वडील


जॅकलिनने शेअर केला बोल्ड फोटो, खांद्यावरील व्रण पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

एका वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार शर्मिला यांनी हा किस्सा शेअर करताना सांगितलं, 'एकदा मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर यांच्याकडून एक कॅच सुटला होता. यावरून दुसरं कोणी नाही तर चक्क शर्मिला यांच्या वडिलांनींच त्यांना यासाठी दोषी मानलं होतं. एवढंच नाही तर त्यांचे वडील त्यांच्यावर चिडले आणि म्हणले, तुझ्यामुळे त्यानं कॅच सोडला तू त्याला रात्रभर जाग ठेवायला नको होतं.'


शर्मिला टागोर यांच्या अभिनयाचे चाहते जसे त्यावेळी होते तसेच मन्सूर अली खान पतौडी यांच्या खेळाचे चाहते सुद्धा त्यावेळी होते. आज ज्याप्रमाणे अनेकदा अनुष्का शर्माला विराट कोहलीच्या वाईट प्रदर्शनासाठी लोकांचे टोमणे आणि टीका ऐकावी लागते तसं त्यावेळी शर्मिला यांच्यासोबतही घडलं होतं. मन्सूर अली खान पतौडी यांच्या वाईट प्रदर्शनासाठी अनेकदा शर्मिला टागोर यांच्यावर टीका होत असे.

शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. या दोघांना सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान अशी तीन मुलं आहेत. २२ सप्टेंबर २०११ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी मन्सूर अली खान पतौडी यांनी दिल्ली येथील सर गंगा राम रुग्णालयात शेवटचा शेवटचा श्वास घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज