अ‍ॅपशहर

गाजर आणि बीटची हेल्दी ड्रिंक रेसिपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2020, 4:44 pm
  • 25mTotal Time
  • 10mPrep Time
  • 160Calories
उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय पेय म्हणून कांजी ओळखळी जाते. या खास पेयाची रेसिपी गाजर आणि बीटपासून बनवली जाते. ही कांजी त्याच्या खास स्वाद आणि रंगामुळे अधिकच आकर्षक वाटते. तडका देताना वापरण्यात येणारी मोहरी या पेयामध्ये टाकल्यामुळे त्याला एक वेगळीच रंगत आणते. तर असं हे आरोग्यदायी आणि चवीला भारी असलेलं पेय सर्व्ह करुन आपल्या नातेवाईकांना खुश करा. जाणून घ्या गाजर आणि बीट यासारख्या हेल्दी पदार्थांपासून तयार होणा-या पेयाची साधीसोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी!
Serving: 5

महत्त्वाची सामग्री

  • 1 कप Fresh produce
  • 1 कप Fresh produce
  • 3 लीटर Grocery Store

How to make: गाजर आणि बीटची हेल्दी ड्रिंक रेसिपी

Step 1: व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजराचे लहान लहान तुकडे करा

सर्वप्रथम व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजराचे लहान लहान तुकडे करा. गाजर मधोमध चिरुन त्यातील पिवळा भाग काढून टाका व उर्वरीत गाजराचे बारीक तुकडे करा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम carrot and beetroot kanji or healthy drink recipe in marathi
गाजर आणि बीटची हेल्दी ड्रिंक रेसिपी


Step 2: एका बीटाची साल काढून त्याचेही लांब आणि पातळ काप करा

आता एक बीट स्वच्छ धुवून घ्या आणि साल काढून त्याचेही लांब आणि पातळ काप करा.



Step 3: गाजराचे तुकडे, बीट, मीठ, काळं मीठ, लाल तिखट पावडर, बारीक कुटलेली मोहरी मिक्स करा

एका मोठ्या काचेच्या बरणीत ३ लीटर पाणी घेऊन त्यामध्ये गाजराचे तुकडे, बीट, १ चमचा मीठ, १ चमचा काळं मीठ, १ चमचा लाल तिखट पावडर आणि २ चमचे बारीक कुटलेली मोहरी घालून सर्व सामग्री व्यवस्थित ढवळून मिक्स करा.



Step 4: बरणी एका पातळ कपड्याने झाकून त्यावर बारीक छिद्र असलेले झाकण लावा

आता ही बरणी एका पातळ कपड्याने झाकून त्यावर बारीक छिद्र असलेले झाकण लावा. हे पेय ४ ते ५ दिवस दररोज चमच्याने दिवसातून एकदा ढवळा.



Step 5: तयार झालाय आपला स्वादिष्ट आणि हेल्दी गाजर आणि बीटचा ज्यूस!

पेय चांगली मिक्स होण्यासाठी तुम्ही ही बरणी २ ते ३ दिवस सुर्यप्रकाशात ठेऊ शकता. तयार झालाय आपला स्वादिष्ट आणि हेल्दी गाजर आणि बीटचा ज्यूस!



Step 6: ​गाजर आणि बीटाची हेल्दी ड्रिंक रेसिपी :- पाहा VIDEO

​व्हिडीओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करुन बनवा गाजर आणि बीटाचे हेल्दी आणि स्वादिष्ट पेय!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज