अ‍ॅपशहर

सर्वात मका

छान पाऊस भुरभुरतोय. आपण लोणावळ्याच्या घाटात आहोत. आसमंत थंड हवेने मोहरून गेलाय. आपण पावसात पूर्ण भिजलोय. अंगावर शहारे येतायत आणि अशातच समोर दिसतो तो मक्याचं कणीस भाजून देणारा भुट्टेवाला. या मस्त वातावरणात खरपूस भाजलेलं, मीठ-मसाला लावलेल्या मक्यावर ताव मारणं म्हणजे जणू स्वर्गसुखच. पावसात सगळ्यांनाच हव्याहव्याशा वाटणाऱ्या मक्याच्या काही चटपटीत रेसिपीज खास तुमच्यासाठी…

Maharashtra Times 5 Aug 2016, 2:55 am
छान पाऊस भुरभुरतोय. आपण लोणावळ्याच्या घाटात आहोत. आसमंत थंड हवेने मोहरून गेलाय. आपण पावसात पूर्ण भिजलोय. अंगावर शहारे येतायत आणि अशातच समोर दिसतो तो मक्याचं कणीस भाजून देणारा भुट्टेवाला. या मस्त वातावरणात खरपूस भाजलेलं, मीठ-मसाला लावलेल्या मक्यावर ताव मारणं म्हणजे जणू स्वर्गसुखच. पावसात सगळ्यांनाच हव्याहव्याशा वाटणाऱ्या मक्याच्या काही चटपटीत रेसिपीज खास तुमच्यासाठी…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corn recepies
सर्वात मका

० मका भेळ तव्यावर थोडं बटर टाकून मक्याचे दाणे भाजून घ्यावेत. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काळीमिरी पूड, कोथिंबीर-पुदिना-हिरवी मिरची चटणी, मीठ, चिंचेची चटणी टाकून एकत्र करावे. बाऊलमध्ये हे मिश्रण घेऊन त्यावर थोडी शेव टाकून सर्व्ह करावी मका भेळ.

० कॉर्न चाट मक्याचे दाणे छान उकडून घ्यावेत. त्यामध्ये एक चमचा बटर, शेझवान चटणी, टोमॅटो सॉस, व मेयॉनीझ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आवडीनुसार चीज घालून कॉर्न चाट बनवावा.

० कॉर्न पिझ्झा पिझ्झा बेसवर बटर, मेयॉनीझ व टोमॅटो सॉस लावून त्यावर उकडलेले मक्याचे दाणे व भरपूर चीज घालून गरम करावे. वरुन काळीमिरी पूड, चिलीफ्लेक्स भुरभुरावे. गरमागरम पिझ्झा खायला तयार !

० मक्याची भजी उकडलेल्या मक्याच्या दाण्यांची जाड भरड करून त्यामध्ये ब्रेड क्रम्ब्स, हळद, मीठ, हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, कांद्याची पात, पाणी, बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व कढईत डीप फ्राय करून मक्याची टेस्टी भजी बनवून सॉससोबत वाढावी.

० भुट्टा सँडविच ब्रेडवर बटर, कोथिंबीर-पुदिना-हिरवी मिरची चटणी, उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, काळीमिरी पूड व चीज घालून टोस्ट करून घ्यावे. टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज