अ‍ॅपशहर

...रोज खाओ अंडे

झटपट पण पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर गृहिणीच्या हाताशी अंड्याचा पर्याय असतोच. अंड्याच्या एकापेक्षा एक खमंग आणि लज्जतदार रेसिपीज बनवता येतात. आज असलेल्या ‘वर्ल्ड एग डे’च्या निमित्ताने अंड्याच्या काही चटकदार रेसिपीज सुप्रसिद्ध शेफ उमा अमृते यांनी मुंटाच्या वाचकांसोबत शेअर केल्या आहेत.

Maharashtra Times 14 Oct 2016, 12:16 am
झटपट पण पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर गृहिणीच्या हाताशी अंड्याचा पर्याय असतोच. अंड्याच्या एकापेक्षा एक खमंग आणि लज्जतदार रेसिपीज बनवता येतात. आज असलेल्या ‘वर्ल्ड एग डे’च्या निमित्ताने अंड्याच्या काही चटकदार रेसिपीज सुप्रसिद्ध शेफ उमा अमृते यांनी मुंटाच्या वाचकांसोबत शेअर केल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम egg recepies by famous chef uma amrute
...रोज खाओ अंडे


कोकोनट कुकीज
साहित्य- सहा अंड्यांचा पांढरा बलक, २०० ग्रॅम पिठीसाखर, २५० ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट, चेरी किंवा काजूचे तुकडे (हवं असल्यास रोझ इसेन्स)
कृती- अंड्याचा पांढरा बलक चांगला फेटून घ्या. त्यामध्ये साखर घालून फोल्ड मेथडने मिश्रण एकत्र करा. एकजीव झाल्यावर डेसीकेटेड कोकोनट घाला. या मिश्रणाचा सैलसर गोळा झाला की, ८ नंबरच्या स्टार नोझलमध्ये हे मिश्रण भरा. मिश्रणाचे गोळे बटर पेपरवर ठेवा. त्यावर चेरी किंवा काजूचे तुकडे घाला. हे १५ ते २० मिनिटं १८० डिग्री सेलसिअस एवढ्या तापमानावर बेक करुन घ्या.

अंड्याचे बॉल्स
साहित्य- दोन टेबल स्पून मैदा, २ टेबल स्पून कॉर्नफ्लार, १ अंड, १ पांढरी कांदा बारिक चिरलेला, दोन टेबल स्पून बारिक लसूण, २ टेबल स्पून सेलरीच्या देठाचे तुकडे दोन टेबल स्पून, २ टेबल स्पून बारिक चिरलेली सिमला मिरची, अर्धा टेबल स्पून ऑरेगॅनो, अर्धी वाटी बारिक चिरलेली कोळंबी किंवा करंदी (अर्धी वाटी ब्रोकोली किंवा फ्लॉवर ही घेऊ शकता), मीठ चवीनुसार
कृती- अंड फेटून त्यामध्ये मीठ, मिरपूड, लसूण, सेलेरीच्या देठाचे तुकडे, ऑरेगॅनो एकत्र करुन घ्या. यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोर घाला. कोळंबी, फ्लॉअर आणि कॉर्नफ्लार एकत्र करुन मिश्रण एकजीव करुन घ्या. मिश्रण जास्त घट्टही नको किंवा जास्त सैलही नको. मिश्रणाचे बॉल्स करुन तळून घ्यावेत. एक चमचा शेजवॉन सॉस आणि २ चमचे टोमॅटो सॉस एकत्र करुन बॉल्सबरोबर सर्व्ह करावं.

हेल्दी ऑम्लेट
साहित्य- २ अंडी, एक कांदा बारिक चिरलेला, अर्धी सिमला मिरची बारिक चिरलेली, पाव वाटी बारिक चिरलेला कोबी, किसलेलं गाजर, बारिक चिरलेलं आलं (२ चमचे), लसूण बारिक चिरलेलं, दोन मिरच्या बारिक चिरलेल्या, चिमूटभर हळद, हिंग आणि काळीमिरी, बारिक चिरलेली कोंथिबीर, दोन-तीन चमचे कॉनफ्लेक्स (भरड करुन घ्या), बटर, मिक्स हर्बस
कृती- सिमला मिरची, गाजर, कोबी, कांदा, मिक्स हर्ब्स, हळद, हिंग एकत्र करुन हातानेच कुस्करुन घ्यावं. दुसऱ्या भांड्यात अंडी फेटून घ्या. भाज्या आणि फेटलेलं अंड एकत्र मिश्रण करुन घ्या. यामध्ये शेवटी कॉनफ्लेक्सची भरड घाला. तव्यावर हे मिश्रण पसरवा आणि त्यांची दोन ते तीन मिनिटं वाफ काढा. हेल्दी ऑम्लेट सॉसबरोबर सर्व्ह करु शकता.

मोगलाई पराठा
साहित्य- दोन वाट्या (मध्यम आकाराच्या) मैदा, दोन वाट्या (मध्यम आकराच्या) कणिक, ४ टेबल स्पून तूप, दोन अंडी, एक बारिक चिरलेला कांदा, ४ हिरव्या मिरच्या, मूठभर कोंथिबीर बारिक चिरलेली, अर्ध वाटी दूध, मीठ (चवीनुसार), पाणी, पराठा परतवण्याकरता तूप
कृती- प्रथम मैदा आणि कणिक एकत्र चाळून घ्या. त्यात मीठ आणि तूप गरम करुन घाला. हे मिश्रण एकत्र करा. त्यात अर्धी वाटी दूध आणि योग्य प्रमाणात पाणी घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. हे मिश्रण अर्धा तास भिजवून ठेवा. दुसऱ्या भांड्यात बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची एकत्र करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये दोन अंडी फेटून घ्या. भिजत घातलेल्या पीठाच्या घडीच्या पोळ्या करा. या पोळ्या पूर्ण न भाजता हलक्या शेकून घ्या (तेल किंवा तूप न लावता). या पोळीच्या एका बाजूवर अंड्याचं मिश्रण पसरवा. पोळीवर आणि बाजूने तूप सोडा. पोळीवरील अंड्याचं मिश्रण सेट झालं की, पोळी उलटा. पोळीच्या दुसऱ्या बाजूलाही असंच करा. असा हा मोगलाई पराठा सॉससोबत सर्व्ह करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज