अ‍ॅपशहर

चविष्ट, चमचमीत…ऑनलाइन

तुम्ही पट्टीचे खवय्ये आहात का? जगभरातल्या खाद्यसंस्कृतींविषयी, वेगवेगळ्या चटकदार पाककृतींविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं? मग लॉगइन करा युट्यूब चॅनेल किंवा इन्स्टाग्रामवर. तिथे तुमच्यासाठी आहेत भरपूर पर्याय. ‘वर्ल्ड फूड डे’निमित्त त्याविषयीच…

Maharashtra Times 16 Oct 2017, 3:32 am
अजय उभारे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम food blogs
चविष्ट, चमचमीत…ऑनलाइन


तुम्ही पट्टीचे खवय्ये आहात का? जगभरातल्या खाद्यसंस्कृतींविषयी, वेगवेगळ्या चटकदार पाककृतींविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं? मग लॉगइन करा युट्यूब चॅनेल किंवा इन्स्टाग्रामवर. तिथे तुमच्यासाठी आहेत भरपूर पर्याय. ‘वर्ल्ड फूड डे’निमित्त त्याविषयीच…

तडका मारलेली चटकदार दालफ्राय असो, झटपट पौष्टिक कटलेट्स असो वा मराठमोळ्या पुरणपोळीपासून मसालेभाताचा घातलेला घाट असो, या सगळ्यासाठी पाककृतींची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. टीव्हीवरही पाककृतींचे वेगवेगळे शोज सुरू असतात. पण त्याबरोबरच आता ऑनलाइनविश्वातही ही सगळी खाद्यजत्रा तुमच्या सेवेसाठी हजर आहे. युट्यूबवर, इन्स्टाग्रामवर पाककृतींविषयी, खाद्यपदार्थांविषयी सांगणारी अनेक चॅनेल्स आहेत. त्यांना हजारोंनी लाइक्स, व्ह्यूजही मिळताहेत.

आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांसाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करत असतो. इंटरनेटच्या या महाजालात खाण्यावर आधारितही खूप काही पाहायला मिळतं. वेगवेगळ्या ठिकाणचे चविष्ट खाणं खाल्ल्यानंतर त्या डिशचं वैशिष्ट्य, त्याची चव इत्यादींबाबत ब्लॉग लिहून इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल साइट्सवर ‘फूड ब्लॉगिंग’ करणं असो, खाद्यप्रेमी मंडळी असं खूप काही शेअर करत असतात. अनेक खवय्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती सोशल साइट्सवर शेअर केली आहे. खाण्याची आवड असणाऱ्या अनेक ‘फूड ब्लॉगर्स’नी वेगवेगळ्या रेसिपींचे रिव्ह्यू त्यांच्या पेजवर प्रसिद्ध केले आहेत.

‘फूड ब्लॉगर्स’ची चलती
अनेक कॉलेज तरुण सध्या फूड ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध हॉटेल्सकडून या ब्लॉगर्सना चांगलीच मागणी असते. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा आकर्षक फोटो, त्या पदार्थाचं वेगळेपण आणि तो पदार्थ कुठे मिळतो याविषयीचा ब्लॉग ही मंडळी त्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. इन्स्टाग्रामवर फूड ब्लॉगिंगची सर्वाधिक क्रेझ असून, अशा फूड ब्लॉगर्सना खास हॉटेलांकडून बोलावलं जातं. तसेच, अनेक ठिकाणच्या स्ट्रीटफूडविषयी हे ब्लॉगर्स स्वतःच लिहितात आणि त्या पदार्थाचं वेगळेपण लोकांपर्यंत पोहोचवतात.

रेसिपीमधलं वेगळेपण जपत सध्या अनेक युट्यूबर्सच्या चॅनल्सना लाखांहून अधिक लाइक्स मिळत आहेत. त्यातलीच काही उदाहरणं…

टेस्टी
व्हिडीओ १ हजार ३०२
लाइक्स ४० लाखाहून अधिक

निशा मधुलिका
व्हिडीओ १ हजार २०९
लाइक्स २० लाखाहून अधिक

संजीव कपूर खजाना
व्हिडीओ ६ हजार ८६२
लाइक्स १० लाखांहून अधिक

रुचकर मेजवानी
२ वर्षांत ९६ हजारांहून अधिक व्हिडिओंना व्ह्यूज

इन्स्टाग्रामवरील अधिकृत फूड पेजेस

फूडनेटवर्क (foodnetwork)
पोस्ट : ४ हजार ८७०
फॉलोअर्स : ५० लाखांहून अधिक

मुंबईफुडी (mumbaifoodie)
पोस्ट : २ हजार ६०२
फॉलोअर्स : २ लाख ८४ हजार

फूडमेनिआक-इंडिया (foodmaniacindia)
पोस्ट : १ हजार ४९७
फॉलोअर्स : १ लाख ६१ हजार

मुंबई फूड ब्लॉगर (mumbaifoodhoggers)
पोस्ट : १५९
फॉलोअर्स : १० हजारांहून अधिक

प्रसिद्ध हॅशटॅग
#food वापरून २४,१४,८७,८४५ पोस्ट
#foodie ७,१९,३४,५३२ पोस्ट
#mumbaifood १,५७,२२९ पोस्ट
#mumbaifoodie ३,२३,६८४ पोस्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज