अ‍ॅपशहर

कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2020, 5:28 pm
  • 20mTotal Time
  • 5mPrep Time
  • 73Calories
बदाम पुरी ही एक अस्सल आणि पारंपरिक साउथ इंडियन मिष्टान्न आहे. मैदा, चिरोट्याचा रवा आणि साखरेच्या पाकापासून ही डिश तयार केली जाते. विशेषतः दसरा सणाच्या दिवशी या गोड पदार्थाचा बेत आखला जातो. ही चविष्ट डिश तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील ही पुरी तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी
Serving: 4

महत्त्वाची सामग्री

  • 2 कप Grocery Store
  • 2/3 चमचे Grocery Store
  • 2/3 चमचे Fresh produce
  • 2 कप Grocery Store
  • 1 कप Dairy

How to make: कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Step 1: मैदा आणि रवा एकत्र घ्या

एका बाउलमध्ये दोन कप मैदा आणि दोन चमचे चिरोट्याचा रवा एकत्र घ्या. आता यामध्ये सहा चमचे तूप घाला आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to make badam puri recipe at home in marathi
कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी


Step 2: बदाम पुरीसाठी पीठ मळून घ्या

आता पिठामध्ये चार चमचे दूध देखील घाला आणि पीठ मळून घ्या.



Step 3: साखर पाक तयार करा

आता पॅनमध्ये दोन वाटी साखर आणि दोन कप पाणी एकत्र घ्या. साखर विरघळेपर्यंत पाणी उकळू द्या. साखर पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.



Step 4: पुरी लाटून घ्या

आता मळलेल्या पिठाचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करा. हे गोळे पुरीसारखे लाटून घ्या. त्रिकोणी आकारात पुरी लाटून द्यावी.



Step 5: पुऱ्या तेलात फ्राय करा

लाटलेल्या पुऱ्या पॅनमध्ये तेलात फ्राय करून घ्या. पुऱ्या करपणार नाहीत, याची काळजी घ्यावी.



Step 6: पुऱ्या साखरेच्या पाकात ठेवा

तळलेल्या पुऱ्या आता साखरेच्या पाकात ठेवा. यानंतर किसलेल्या खोबऱ्याने पुऱ्यांची सजावट करा. तयार झालेली कुरकुरीत



Step 7: बदाम पुरी रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा

undefined

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज