अ‍ॅपशहर

बेसन हलव्याची रेसिपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2020, 9:01 am
  • 35mTotal Time
  • 20mPrep Time
  • 248Calories

बेसन हलवा (Besan Halwa) हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. ही स्वीट डिश आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये लोकप्रिय आहे. पूजा, सेलिब्रेशन तसंच सणासुदीच्या दिवसांत हा गोड पदार्थ तयार केला जातो. जर आपण बेसन हलव्याची चव चाखून पाहिली नसेल तर ही सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करून पाहा. कमीत- कमी सामग्रींपासून बेसन हलवा कसा तयार करावा, जाणून घ्या पाककृती

Serving: 1

महत्त्वाची सामग्री

  • 1 कप Grocery Store
  • 2 चमचे Grocery Store
  • 3/4 कप Grocery Store
  • 3/4 कप Dairy
  • 1 आवश्यकतेनुसार Grocery Store

How to make: बेसन हलव्याची रेसिपी

Step 1: खवा तयार करून घ्या

पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक ग्लास दूध मिक्स करा. दूध थोडा वेळ उकळू द्यावे. दूध उकळल्यानंतर त्यात दूध पावडर घाला आणि मिश्रण ढवळत राहा. ही आहे इन्स्टंट खवा तयार करण्याची सोपी पद्धत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to make besan halwa at home in marathi
बेसन हलव्याची रेसिपी


Step 2: तुपात बेसन फ्राय करा

दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तुपात बेसन परतून घ्या. सामग्री घट्ट होईपर्यंत तीन ते चार मिनिटांसाठी ढवळत राहा.



Step 3: बेसनमध्ये खवा मिक्स करा

बेसनचा रंग बदलल्यानंतर कढईत पाणी ओता. यानंतर खवा देखील मिक्स करावा. दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री नीट ढवळत राहा म्हणजे मिश्रणात गाठी तयार होणार नाहीत. आता ३/४ (तीन चतुर्थांश) कप साखर मिक्स करा आणि हलव्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत सामग्री ढवळत राहा.



Step 4: वेलची पूड व बदाम-पिस्ता

सर्वात शेवटी हलव्यामध्ये वेलची पूड आणि बदाम - पिस्त्याचे काप घालावेत. गरमागरम बेसन हलव्याचा आपल्या कुटुंबीयांसोबत आस्वाद घ्यावा.



Step 5: बेसन हलव्याची संपूर्ण पाककृती पाहा

undefined

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज