अ‍ॅपशहर

शिमला मिरची रायता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2020, 10:12 am
  • 25mTotal Time
  • 10mPrep Time
  • 190Calories

नेहमीचीच कोशिंबीर खाऊन तुम्ही कंटाळे आहेत का? तर आपण आज 'शिमला मिरची रायता' (Capsicum Raita Recipe )ही रेसिपी जाणून घेऊया. शिमला मिरची रायता तयार करण्यासाठी ओले खोबरे, दही, मोहरी, जिरे यासारख्या घरामध्ये सहजरित्या आढणाऱ्या सामग्रींचा वापर केला जातो. पुलाव किंवा प्लेन राइससोबतही तुम्ही या स्वादिष्ट रायत्याचा आस्वाद घेऊ शकता.

Serving: 2

महत्त्वाची सामग्री

  • 1 मध्यम Fresh produce
  • 1 कप Dairy
  • 3/4 कप Fresh produce
  • 1 1/2 चमचे Grocery Store
  • 1 चमचे Grocery Store
  • 1 चमचे Grocery Store
  • 1/2 आवश्यकतेनुसार Grocery Store

How to make: शिमला मिरची रायता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Step 1: ओल्या नारळाची पेस्ट वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये ३/४ (तीन चतुर्थांश) कप किसलेले नारळ, एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी, तीन हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर हिंग एकत्र घ्या व सर्व सामग्री वाटून पेस्ट तयार करा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to make capsicum raita or shimla mirchi raita in marathi
शिमला मिरची रायता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी


Step 2: शिमला मिरची फ्राय करा

आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग, एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून परतून घ्या. यानंतर आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने तेलात फ्राय करा. थोड्या वेळानं चिरलेली शिमला मिरची मिश्रणात घाला आणि परतून घ्या. यानंतर चवीनुसार मीठ घालून शिमला मिरची चार ते पाच मिनिटांसाठी शिजू द्या.



Step 3: खोबऱ्याची पेस्ट

मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट पॅनमध्ये मिक्स करा. त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री पुन्हा ढवळून घ्या.



Step 4: मिश्रणात दही मिक्स करा

गॅस बंद करा आणि तयार केलेला मसाला रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेऊन द्या. आता सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढा व वरून एक कप दही मिक्स करा.



Step 5: बिर्याणी, पुलावसोबत रायत्याचा घ्या आस्वाद

तयार आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज