कुरकुरीत चिकन पकोडा रेसिपी
- 40mTotal Time
- 10mPrep Time
- 453Calories
चहा आणी भजी हे समीकरण फार जुने आहे. आपल्यापैकी बहुतांश जणांना चहासोबत भजी, भजीपाव खायला आवडते. घराघरांमध्येही वेगवेगळ्या प्रकारची भजी तयार केली जाते. कांदा, मिरची, बटाटा, पनीर, कोबी, फ्लावर इत्यादी प्रकारच्या स्वादिष्ट भज्यांचा आस्वाद तुम्ही घेतला असेलच. पण कधी चिकन पकोड्याची चव चाखली आहे का? आपण आज चिकन पकोड्याचीच रेसिपी पाहणार आहोत. संध्याकाळच्या चहासोबत आपण या खमंग भजीचा आस्वाद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी
महत्त्वाची सामग्री
- 350 ग्रॅम Fresh produce
- 1 कप Grocery Store
- 1 कप Grocery Store
- 2/3 चमचे Grocery Store
- 2 - Grocery Store
- 1 चमचे Grocery Store
- 2 चमचे Grocery Store
- 1/2 आवश्यकतेनुसार Grocery Store
- 2/3 चमचे Grocery Store
- 1 मध्यम कांदा
- 2 कप कोथिंबीर
- 2 चमचे Fresh produce
- 1 चमचे Fresh produce
- 1 आवश्यकतेनुसार Grocery Store
- 1 - Fresh produce
- 1 चमचे Grocery Store
- 1/2 चमचे Grocery Store
- 3 चमचे Grocery Store
How to make: कुरकुरीत चिकन पकोडा रेसिपी
एका मोठ्या बाउलमध्ये एक कप मैदा, कॉर्न फ्लोर, तांदळाचं पीठ, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धणे पूड, दीड चमचा मिरपूड, दोन चमचे हळद, दोन अंडी, चिरलेले लसूण, किसलेले आले, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरेपूड, एक चमचा चिकन मसाला, एक चमचा हिंग, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि कोथिंबीर एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर बारीक चिरलेले कांदे देखील घाला.
Step 2: पिठात चिकन मिक्स करा
बाउलमध्ये थोडंसं पाणी ओता व सर्व सामग्री एकजीव करून घ्या. यानंतर बाउलमध्ये चिकन मिक्स करा. पकोड्यांची चव अधिक वाढवण्यासाठी आपण त्यात व्हिनेगर देखील घालू शकता.
Step 3: पकोडे फ्राय करा
पकोड्याचं मिश्रण सेट होण्यासाठी ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. थोड्या वेळानंतर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. थोडं थोडं मिश्रण घेऊन पकोडे तळून घ्या. तेलामध्ये कढीपत्ता देखील घालावा. पकोडे नीट फ्राय करून घ्यावेत.
Step 4: चिकन पकोड्यांचा घ्या आस्वाद
गरमागरम पकोडे सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.
Step 5: चिकन पकोडा रेसिपी, पाहा संपूर्ण व्हिडीओ
undefined