अ‍ॅपशहर

चविष्ट..कुरकुरीत

बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस....अंगाला झोंबणारा वारा, अशा वेळी हातात वाफाळता चहा आणि चविष्ट भजीची प्लेट...स्वर्गसुखच जणू! कांदा-बटाट्याची भजी तर आपण दर पावसाळ्यात बनवतो. यंदा कुछ हटके हो जाए! म्हणूनच मटाने तुमच्यासाठी आणल्या आहेत खास मान्सून स्पेशल भजी रेसिपीज

Maharashtra Times 30 Jun 2017, 2:19 am
बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस....अंगाला झोंबणारा वारा, अशा वेळी हातात वाफाळता चहा आणि चविष्ट भजीची प्लेट...स्वर्गसुखच जणू! कांदा-बटाट्याची भजी तर आपण दर पावसाळ्यात बनवतो. यंदा कुछ हटके हो जाए! म्हणूनच मटाने तुमच्यासाठी आणल्या आहेत खास मान्सून स्पेशल भजी रेसिपीज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon special bhaji
चविष्ट..कुरकुरीत


बेबी कॉर्न भजी
साहित्य - १०-१२ बेबी कॉर्न, १ वाटी बेसन, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा कॉर्नफ्लोर, ३-४ लसूण पाकळ्या, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १ लहान तुकडा आलं, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, १/२ चमचा चाट मसाला, १/२ वाटी पातीचा कांदा, चिमूटभर बेकिंग सोडा, ३ चमचे तेल.

कृती- सर्वप्रथम बेबी कॉर्न स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरमध्ये आलं-लसूण- मिरची पेस्ट बनवून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ व वरील पेस्ट घेऊन एकजीव करा. आवश्यकतेनुसार थोडे-थोडे पाणी घाला व ढवळून हलके करून घ्या. गरम तेल, कोथिंबीर, मीठ व सोडा घालून मिश्रण पुन्हा ढवळून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर बेबी कॉर्न्स या मिश्रणात घोळवून तळून घ्या व पुदिना चटणी सोबत सर्व्ह करा.

व्हेजी पकोडा
साहित्य- २ वाट्या बेसन, ४ चमचे तेल, २ चमचे जिरे, १ बारीक चिरलेली ढोबळी मिरची, १/२ वाटी पाणी, १ मध्यम आकाराचा बटाटा, १ वाटी फ्लॉवरचे तुकडे, १/२ वाटी चिरलेला कोबी, ४-५ पालकाची पाने, १-१/२ वाटी चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ.

कृती- प्रथम बटाटा उकडून घ्या. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. एक बाऊलमध्ये बेसन, मीठ, तेल, जिरे व पाणी एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्या व अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्यामध्ये भाज्या घालून नीट ढवळून घ्या व मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. गरमागरम व्हेजी पकोडा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज