साहित्य-:शिजवलेले नूडल्स, पिझ्झा बेस, पास्ता सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस,कॉन्फ्लॉवर, १ सिमला मिरची, २ कांदे, २ टोमॅटो, बेबीकॉर्न, ओलिव्स,चीज, मीठ व पनीर कृती-: सर्वात प्रथम नूडल्स शिजवून घ्या. नंतर त्यात थोडसं मीठ टाका. फ्राईंग पॅनवर बटर टाका आणि शिजवलेले नूडल्स त्यावर पसरवा. एका बाऊलमध्ये १ चमचा कॉन्फ्लॉवर घाला. त्यात पाणी घालून ते मिश्रण पॅनवरील नूडल्सवर घाला. मग त्यावर कांदा, सिमला मिरची,टोमॅटो, बेबी कॉर्न, पनीर आणि ओलिव्स घाला. या मिश्रणात चीज स्लाईस घालून एकत्र करा. त्यानंतर ते मिश्रण पिझा बेस वर पसरवा आणि तो सर्व करा. -सुप्रिया पाल्येकर, बोरिवली
नूडल्स क्रिस्पी पिझ्झा
सर्वात प्रथम नूडल्स शिजवून घ्या. नंतर त्यात थोडसं मीठ टाका. फ्राईंग पॅनवर बटर टाका आणि शिजवलेले नूडल्स त्यावर पसरवा. एका बाऊलमध्ये १ चमचा कॉन्फ्लॉवर घाला. त्यात पाणी घालून ते मिश्रण पॅनवरील नूडल्सवर घाला. मग त्यावर कांदा, सिमला मिरची,टोमॅटो, बेबी कॉर्न, पनीर आणि ओलिव्स घाला. या मिश्रणात चीज स्लाईस घालून एकत्र करा. त्यानंतर ते मिश्रण पिझा बेस वर पसरवा आणि तो सर्व करा.
Maharashtra Times 25 Feb 2016, 12:12 am