अ‍ॅपशहर

पोहा आलू टिक्की

साहित्य – भिजवलेले पोहे, किसलेले पनीर, दोन ते तीन उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम्स, आलं – लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, धने – जिरे पावडर, मिरपूड, मीठ.

Maharashtra Times 30 Jul 2016, 3:21 am
मृणाल देशपांडे, डोंबिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम poha aloo tikki
पोहा आलू टिक्की


साहित्य – भिजवलेले पोहे, किसलेले पनीर, दोन ते तीन उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम्स, आलं – लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, धने – जिरे पावडर, मिरपूड, मीठ.

कृती – प्रथम एका बाऊलमध्ये भिजवलेले पोहे घ्यावेत, उकडलेले बटाटे कुस्करून किंवा किसून त्यामध्ये एकत्र करावेत. किसलेले पनीर असे सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर त्यात लसूण, मिरची पेस्ट, थोडी धने- जिरे पावडर, मिरपूड व चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाच्या छोट्या टिक्की बनवाव्यात. ब्रेड क्रम्समध्ये घोळवून शॅलो फ्राय कराव्यात आणि पुदीना चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.

अधिक पौष्टिकतेसाठी वरील मिश्रणात गाजर, बीटदेखील किसून घालता येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज