अ‍ॅपशहर

बच्चेकंपनीसाठी रवा केक

शाळांना सुट्टी पडली की दिवसभर घरी असणाऱ्या मुलांच्या आवडीचं काही ना काही करावंच लागतं. अशा वेळी मुलांना आवडणारा केक तुम्ही सहज करू शकता. केक म्हटला की त्याची कटकटच फार, असं वाटतं. पण रवा केक करायला एकदम सोपा आणि सुटसुटीत आहे.

Maharashtra Times 19 May 2018, 10:43 am
शाळांना सुट्टी पडली की दिवसभर घरी असणाऱ्या मुलांच्या आवडीचं काही ना काही करावंच लागतं. अशा वेळी मुलांना आवडणारा केक तुम्ही सहज करू शकता. केक म्हटला की त्याची कटकटच फार, असं वाटतं. पण रवा केक करायला एकदम सोपा आणि सुटसुटीत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rava cake for children
बच्चेकंपनीसाठी रवा केक


साहित्य:- १ वाटी रवा, १ वाटी दही, १ वाटी दूध (दूध गरम नसावे), १ वाटी साखर, १-२ चमचे तूप, १ चिमूटभर बेकिंग सोडा, वेलचीपूड / दालचिनी पावडर, सुका मेवा, बेक करण्यासाठी पसरट ओव्हन सेफ भांडे

कृती:- प्रथम रवा, दही, दूध, साखर, तूप एकत्र करून २०-२२ मिनिटे फेटावे. साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे. हे सर्व मिश्रण २-३ तास झाकून ठेवून द्यावे. २-३ तासांनी ओव्हन ३७५ F (१९० C) प्रीहीट करायला लावावा. मधल्या वेळात ओव्हनसेफ भांड्याला तूपाचा हात लावून घ्यावा. नंतर १ चमचा पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा घालावा, मिक्स करून फेटलेल्या मिश्रणात घालावा. आवडीनुसार वेलचीपूड किंवा दालचिनी पावडर घालावी. मिश्रण १ मिनिट ढवळावे. मिश्रण ओव्हनसेफ भांड्यात ओतावे. वरून काजू बदाम पिस्त्याचे तुकडे पसरावे आणि ३७५ F ( १९० C) वर १८ ते २० मिनिटे बेक करावे. बेक करताना १०-१२ मिनिटानंतर मधेमधे ओव्हनमधील लाइट लावून केक चेक करावा. केकच्या कडा ब्राऊन रंगाच्या होतात, तसेच केकचा छान गंध सुटला की केक झाला असे समजावे. ओव्हन बंद करून १-२ मिनिटांनी केक बाहेर काढावा. गरम गरम खायला छान लागतोच, तसेच २ दिवस टिकतोसुद्धा! असा केक बच्चेकंपनीला आवडणारच!

- प्रिया प्रकाश निकुम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज