अ‍ॅपशहर

घरीच बनवा 'मिक्स फ्रुट जॅम'

जॅम-जेली यांचं छोट्यांना भलतंच वेड असतं. आंबट-गोड फळांपासून बनविलेले 'मिक्स फ्रुट जॅम' जेवढे टेस्टी तेवढेच हेल्दीही. फळे न खाणाऱ्या मुलांना मिक्स फ्रुट जॅम द्या, म्हणजे जॅम मिळाला म्हणून मुलं खूष आणि फळं त्यांच्या पोटात गेली म्हणून मम्मी खूष!पाहा मग ही मिक्स फ्रुट जॅम रेसिपी खास तुमच्या छोट्यांसाठी...

Maharashtra Times 15 Dec 2016, 1:54 pm
जॅम-जेली यांचं छोट्यांना भलतंच वेड असतं. आंबट-गोड फळांपासून बनविलेले 'मिक्स फ्रुट जॅम' जेवढे टेस्टी तेवढेच हेल्दीही. फळे न खाणाऱ्या मुलांना मिक्स फ्रुट जॅम द्या, म्हणजे जॅम मिळाला म्हणून मुलं खूष आणि फळं त्यांच्या पोटात गेली म्हणून मम्मी खूष! पाहा मग ही मिक्स फ्रुट जॅम रेसिपी खास तुमच्या छोट्यांसाठी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम recipe homemade mixed fruit jam with apple banana strwaberrry pineapple orange
घरीच बनवा 'मिक्स फ्रुट जॅम'


साहित्य:
साल काढून तुकडे केलेल्या फळांमध्ये २ पिकलेले सफरचंद, २ पिकलेली केळी, २ संत्री, मनुका, ४ कप बी नसलेली काळी द्राक्षे, ६-८ स्ट्रॉबेरी, १ अख्खा अननस, दिड कप किंवा आवश्यकतेनुसार साखर, अर्धा कप लिंबाचा रस

कृती:
१. मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये सगळी फळे घालून चांगली प्युरी होईपर्यंत फिरवा.
२. एका पॅनमध्ये साखर आणि प्युरी ओतून मंद आचेवर शिजवा.
३. मिश्रणाला उकळी फुटेपर्यंत सतत ढवळत राहा.
४. हळुहळू मिश्रण घट्ट होऊन जॅमच्या रुपात येण्यास सुरूवात होईल.
५. मग लिंबाचा रस त्यात घाला आणि ढवळा.
६. जॅम पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवा. थोड्याथोड्या वेळाने ढवळत राहा.
७. मंद आचेवर शिजण्यासाठी साधारण १ ते दिड तास वेळ लागतो.
८. मिश्रण जॅम स्वरुपात आले असे वाटले की गॅस बंद करा.

टीप्स:
१. मंद आच आणि मिश्रण सतत ढवळत राहणे
२. जॅम तयार झाला हे पाहायचे असल्यास चमच्यात ते मिश्रण उचलून धरा आणि ते पुन्हा भांड्यात पाडण्याचा प्रयत्न करा. मिश्रण थेंब थेंब न पडता एकदम सगळे पडले की समजा जॅम तयार झाला.
३. किंवा प्लेटमध्ये ते मिश्रण थोडे घ्या. ते पसरले तर जॅम तयार झालेला नाही आणि पसरले नाही तर जॅम तयार आहे.
४. जॅम पूर्णतः थंड झाला की मगच काचेच्या बरणीत भरा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज