अ‍ॅपशहर

चटपटीत पालक पत्ता चाट

पालक पत्ता चाट ही एक उत्तर भारतीय रेसिपी आहे. पचन व्यवस्था सुधारण्यासाठी हा स्नॅक्सचा हेल्दी पर्याय आहे. एरव्ही न आवडणारा पालक चाटच्या रूपात मात्र आवडीने खाल्ला जाईल, हे नक्की... मग लगेच ट्राय करा चटपटीत पालक चाट!

Maharashtra Times 19 Dec 2016, 10:31 am
पालक पत्ता चाट ही एक उत्तर भारतीय रेसिपी आहे. पचन व्यवस्था सुधारण्यासाठी हा स्नॅक्सचा हेल्दी पर्याय आहे. एरव्ही न आवडणारा पालक चाटच्या रूपात मात्र आवडीने खाल्ला जाईल, हे नक्की... मग लगेच ट्राय करा चटपटीत पालक चाट!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम recipe palak patta chaat
चटपटीत पालक पत्ता चाट

साहित्य:
पालक पाने, बेसन, मीठ, मिरपूड, ओवा, गोड दही, चिंचेचा सॉस, हिरवी पुदीना चटणी, शेव

कृती:
१. पालकची ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्या.
२. पाणी आणि आवश्यकतेनुसार बेसन घालून त्याचे बॅटर तयार करून घ्या.
३. चवीसाठी त्यात थोडे मीठ, मिरपूड घाला.
४. वरून थोडासा ओवा घाला.
५. पालक पाने या बॅटरमध्ये बुडवून चांगली तळून घ्या.
६. तळलेल्या पालक पानांवर वरून गोड दही, चिंचेचा सॉस आणि पुदीना चटणी पसरवा.
७. सजावटीसाठी वरून कुरकुरीत शेव घाला.
८. आणि चटपटीत पालक चाट लगेच सर्व्ह करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज