अ‍ॅपशहर

पौष्ट‌कि अन् चवदारही

सोयाबीनचं नाव काढलं तरी कित्येकजण नाक मुरडतात. हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्येदेखील सोयाबीनची एखादी रेसिपी असते. प्रथिनांचं उत्तम स्त्रोत असलेल्या सोयाबीनकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल? सोयाबीनच्या चटकदार रेसिपीज खासतुमच्यासाठी...

Maharashtra Times 17 Nov 2016, 12:49 am
सोयाबीनचं नाव काढलं तरी कित्येकजण नाक मुरडतात. हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्येदेखील सोयाबीनची एखादी रेसिपी असते. प्रथिनांचं उत्तम स्त्रोत असलेल्या सोयाबीनकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल? सोयाबीनच्या चटकदार रेसिपीज खास तुमच्यासाठी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम soyabean recepies
पौष्ट‌कि अन् चवदारही


सोयाबीन कटलेट्स

साहित्य - १ कप भिजवलेले सोया ग्रॅन्युल्स, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट, ८-१० कढीपत्ता, मीठ, प्रत्येकी १/२ चमचा लालतिखट, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, प्रत्येकी १/४ कप बेसन आणि ब्रेडक्रम्ब्स, १ चमचा लिंबाचा रस, बारिक चिरलेली कोथिंबीर, तेल

कृती - प्रथम सोया ग्रॅन्युल्स अर्धा तास गरम पाण्यात भिजवून घ्या आणि नंतर जास्तीचं पाणी काढून कुस्करुन घ्यावेत. कढईत २-३ चमचे तेल गरम करुन त्यामध्ये कांदा, कढीपत्ता, आलं-लसूण-मिरची पेस्ट, वरील सर्व मसाले, बेसन घालून परता. नंतर त्यामध्ये ग्रॅन्युल्स, १/४ कप पाणी घालून ३-४ मिनिटं वाफेवर शिजवून घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर आणि ब्रेडक्रम्ब्स घालून मिश्रण घट्ट आणि एकजीव करुन थोडं थंड झाल्यावर आवडीच्या आकाराचे गोळे करून तव्यावर शॅलो फ्राय करावेत.

सोया मंच्युरिअन

साहित्य- १ मोठी वाटी सोया चंक्स, प्रत्येकी २ चमचे मैदा आणि कॉर्नस्टार्च, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, मीठ

ग्रेव्हीसाठी - १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा-लसूण आणि आलं, प्रत्येकी २ चमचे सोया सॉस आणि चिली सॉस, प्रत्येकी १ चमचा व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस, प्रत्येकी १/४ चमचा लाल तिखट, काळीमिरी पूड , १/४ वाटी बारीक चिरलेला कोबी, कॉर्नस्टार्च पेस्ट

कृती- सोया चंक्स १० मिनिटं गरम पाण्यात भिजवून घ्यावेत आणि जास्तीचे पाणी काढून टाकावं. एका बाऊलमध्ये हे सोयाचंक्स, मैदा, आलं-लसूण पेस्ट, कॉर्नस्टार्च आणि मीठ घालून मिक्स करावं. ते कुरकुरीत तळून घ्यावेत. एका वाटीत तीन चमचे कॉर्नस्टार्च आणि अर्धी वाटी पाणी घालून पातळ पेस्ट करुन घ्यावी. कढईत ४ चमचे तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, आलं आणि कांदा घालून हलके परतावं. नंतर त्यात कोबी, व्हिनेगर, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, कॉर्न स्टार्च पेस्ट, लाल तिखट, काळीमिरी पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत साधारण १० मिनिटं छान ढवळून घ्यावं. तयार झाल्यावर त्यात तळलेले सोया चंक्स घालून गरमागरम हेल्दी सोया मंच्युरियन सर्व्ह करावं.

सोयाबीन पराठा

साहित्य - ३/४ वाटी गव्हाचं पीठ, १/४चमचा मीठ, २ चमचे तेल.

सारण - १/२ वाटी सोया चंक्स, २ चमचे तेल, १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेली मिरची, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, प्रत्येकी १/२ चमचा गरम मसाला, किचन किंग मसाला आणि धणेपूड, प्रत्येकी १/४ चमचा जीरं आणि काळीमिरी पूड, मीठ, १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती - सोया चंक्स गरम पाण्यात १५ मिनिटं भिजवून घ्यावेत. नंतर हलके दाबून पाणी काढून टाकावं आणि मिक्सरमध्ये बारिक करुन घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करुन जीरं, आलं-लसूण पेस्ट, कांदा आणि मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक केलेले सोयाचंक्स, सर्व मसाले, धणेपूड, काळीमिरी पूड, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावं. गव्हाचं पीठ थोडे घट्ट मळून घ्यावं आणि त्याच्या समान पाऱ्या कराव्यात. त्यामध्ये वरील मिश्रण भरुन पोळी लाटून घ्यावी आणि तूप, तेल किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यावी. हा पराठा दही किंवा टोमॅटो सॉससोबत गरम असताना छान लागतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज