अ‍ॅपशहर

FBवरही बाजार भरणार; जुन्या वस्तू विकता येणार

तासन् तास फेसबुकला चिकटून असणाऱ्या युजर्ससाठी फेसबुक लवकरच 'मार्केट प्लेस' नावाचं नवीन फिचर सुरू करणार आहे. या फिचरच्या माध्यमातून फेसबुक युजर्स जुन्या सामानाची खरेदी-विक्री करू शकणार आहेत. सध्यातरी फेसबुक फक्त मुंबईमध्ये या फिचरची चाचणी घेत आहे. मुंबईत या फिचरला चांगला प्रतिसाद मिळाल्यास संपूर्ण देशात हे फिचर लाँच केलं जाणार आहे.

Maharashtra Times 20 Nov 2017, 1:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम facebook starts trial of marketplace feature
FBवरही बाजार भरणार; जुन्या वस्तू विकता येणार

तासन् तास फेसबुकला चिकटून असणाऱ्या युजर्ससाठी फेसबुक लवकरच 'मार्केट प्लेस' नावाचं नवीन फिचर सुरू करणार आहे. या फिचरच्या माध्यमातून फेसबुक युजर्स जुन्या सामानाची खरेदी-विक्री करू शकणार आहेत. सध्यातरी फेसबुक फक्त मुंबईमध्ये या फिचरची चाचणी घेत आहे. मुंबईत या फिचरला चांगला प्रतिसाद मिळाल्यास संपूर्ण देशात हे फिचर लाँच केलं जाणार आहे.

ऑनलाइन मार्केटमध्ये हे फिचर ओएलएक्स, क्विकरसारख्या अॅप्सना टक्कर देऊ शकते. ओएलएक्स आणि क्विकरप्रमाणेच तुम्हाला 'मार्केट प्लेस'वर जुन्या सामानाचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. 'मार्केट प्लेस' हे फिचर अमेरिका आणि अन्य २५ देशांमध्ये आधीपासूनच कार्यरत आहे. अलीकडेच जर्मनी, फ्रांस, इंग्लडसह १७ देशांमध्ये हे फिचर सुरू करण्यात आलं आहे.

फेसबुक अॅपवरील शॉप बटणवर क्लिक करताच 'मार्केट प्लेस'वर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सामानांची यादी दिसेल. विक्रेत्यांच्या प्रोफाइलचीही माहिती यातून मिळणार आहे. तिथं युजर्सला स्वत:च्या विक्रीयोग्य वस्तूही अपलोड करता येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज