अ‍ॅपशहर

फेसबुक रोखणार आत्महत्या

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक युजर्सची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील काही काळापासून फेसबुक लाइव्हचा वापर करुन आत्महत्या करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. आत्महत्या रोखण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे

Maharashtra Times 29 Nov 2017, 9:32 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम facebook using artificial intelligence for suicide prevention
फेसबुक रोखणार आत्महत्या


सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक युजर्सची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील काही काळापासून फेसबुक लाइव्हचा वापर करुन आत्महत्या करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. आत्महत्या रोखण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे.

फेसबुकने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्या युजर्सला त्वरित मदत मिळणे आवश्यक असल्याचे फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाचे उपाध्यक्ष गाय रोसेन यांनी सांगितले. केवळ मित्र परिवारच नव्हे तर नातेवाईकही फेसबुकवरील मित्रयादीत असतात. जर, युजर्सने आत्महत्येबाबत पोस्ट टाकली किंवा लाइव्ह व्हिडीओ केल्यास त्याची माहिती त्वरित त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना कळवण्यात येईल. जेणेकरुन तो युजर्स आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होऊ शकतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापरामुळे आत्महत्येबाबतच्या पोस्ट, लाइव्ह स्ट्रीमिंग शोधण्यास मदत होणार आहे. अधिक अचूकता येण्यासाठी या तंत्रज्ञानावर सातत्याने काम करणार असल्याचे रोसेन यांनी सांगितले. काही महिने आधीच प्रायोगिक तत्वावर अमेरिकेत फेसबुकने सुसाईड प्रीव्हेन्शन टूल लाँच केले होते. आता युरोपीयन महासंघातील देश वगळता अन्य देशात हे टूल कार्यरत असणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज