अ‍ॅपशहर

मुंबईकर गौरांगचा तुफानी ‘गोल’

फूटबॉलवर एवढं प्रेम, की त्या प्रेमापोटी गौरांग मांजरेकर या तरुणाने फूटबॉलवर ब्लॉग लिहिणं सुरू केलं. या ब्लॉगलिखाणानेच या मुंबईकर तरुणाला जगभरात नाव मिळवून दिलंय. त्याच्या ब्लॉगला नुकताच इंग्लंडमध्ये ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फूटबॉल ब्लॉग’ असा मानाचा पुरस्कार मिळाला. हा अद्भूत प्रवास त्याने खास ‘मटा’शी शेअर केला.

Maharashtra Times 26 Nov 2016, 2:34 am
फूटबॉलवर एवढं प्रेम, की त्या प्रेमापोटी गौरांग मांजरेकर या तरुणाने फूटबॉलवर ब्लॉग लिहिणं सुरू केलं. या ब्लॉगलिखाणानेच या मुंबईकर तरुणाला जगभरात नाव मिळवून दिलंय. त्याच्या ब्लॉगला नुकताच इंग्लंडमध्ये ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फूटबॉल ब्लॉग’ असा मानाचा पुरस्कार मिळाला. हा अद्भूत प्रवास त्याने खास ‘मटा’शी शेअर केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gaurang manjarekar
मुंबईकर गौरांगचा तुफानी ‘गोल’


swapnil.ghangale@timesinternet.in
Twitter: @swapnilcsgmt

‘अँड द जजेस चॉइस अॅवॉर्ड फॉर द बेस्ट इंटरनॅशनल फूटबॉल ब्लॉग गोज टू इंडिया’ अशी घोषणा झाली आणि टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. गौरांगचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. फुटबॉल ब्लॉगर्सच्या विश्वात भारताचं नाव कोरणारा गौरांग हा पहिलाच भारतीय ठरला आहे. तीन हजार ब्लॉगर्समधून, ३ लाखांहून अधिक मतांच्या आधारावर विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. इंग्लंडमधल्या मॅन्चेस्टर युनायडेटचं होम ग्राउंड असणाऱ्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात फुटबॉल ब्लॉगिंग पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देऊन गौरांगला गौरवण्यात आलं.

आवडता खेळ असलेल्या फुटबॉलवर गौरांग वयाच्या अठराव्या वर्षापासून लिहायला लागला. गंमत म्हणून लिहिता-लिहिता लिखाणाच्या आणि या खेळाच्या तो आणखीनच प्रेमात पडला. स्वत: उत्तम फुटबॉलपटू असणाऱ्या गौरंगला मिळालेला पुरस्कार जास्त विशेष वाटतो, कारण तो परीक्षकांची निवड म्हणून देण्यात आला आहे.

उत्तम लिखाण, विषयावरील पकड या सर्वांचा विचार करून खेळ आणि लिखाणाचा उत्तम मेळ साधणाऱ्या ब्लॉगला देण्यात येणारा पुरस्कार गौरंगने पटकावला. अनेक नामांकित वृत्तपत्रांमधले क्रीडा पत्रकार यासाठी परीक्षक म्हणून काम पाहत होते. या पुस्कार सोहळ्याच्या निमित्तानं फुटबॉलमध्येही इतक्या प्रकारचे ब्लॉगर्स असून, ते किती भन्नाट काम करतायत हे त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्याने ही सुवर्णसंधी ठरली, असं तो सांगतो. भारतातल्या फुटबॉलला चालना देण्यासाठी या गोष्टींचा वापर करू, असा विश्वास गौरंग व्यक्त करतो.

फूटबॉल पॅराडाइसविषयी
फुटबॉलची आवड असणारे त्याचे काही ओळखीचे लोक गेल्या आठ वर्षांपासून गौरांगबरोबर या ब्लॉगसाठी काम करत आहेत. या ब्लॉगमधून त्यांनी पैसा कमावलेला नाही. मात्र खेळाची पॅशन आणि वाचकांकडून मिळणारा प्रतिसादच लिहिण्यासाठी प्रवृत्त करतो असं ते म्हणतात. भारतीय उपखंडांबरोबरच अमेरिका आणि ब्रिटनमधूनही गौरांग आणि त्याच्या टीमचा footballparadise.com हा ब्लॉग वाचला जातो. सोशल नेटवर्किंगवर या ब्लॉगचे लाखो चाहते आहेत.

ब्लॉगमुळे मानसन्मान
गौरांगच्या या वेगळ्या ब्लॉगमुळे त्याची अमेरिकेतल्या हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्येही खास मुलाखत घेण्यात आली होती. भारतात फुटबॉल या खेळाची स्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी गौरंग आणि त्याच्या टीमला विशेष आमंत्रण दिलं आहे.

‘या ब्लॉगमुळे मला फुटबॉल विश्वातल्या अनेक लोकांना भेटता आलं, अनेक ठिकाणी फिरता आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय फुटबॉलचं विश्व मला ब्लॉगच्या माध्यमातून जगभरात पोहचवता आल्याचा जास्त आनंद वाटतो’, असं गौरंग सांगतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज