अ‍ॅपशहर

२२ वर्षांपासून माणूस बेपत्ता; गुगलने शोधले!

अमेरिकेतील फ्लोरिडा येथून २२ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या माणसाचा शोध गुगलच्या मदतीने लागला आहे. विलियम मॉल्ड, असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ७ नोव्हेंबर १९९७ रोजी तो हरवला होता. २२ वर्षांपूर्वी विलियम एका क्लबमध्ये गेले होते आणि त्यानंतर ते कुणालाच दिसले नाहीत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2019, 8:36 pm
नवी दिल्लीः अमेरिकेतील फ्लोरिडा येथून २२ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या माणसाचा शोध गुगलच्या मदतीने लागला आहे. विलियम मॉल्ड, असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ७ नोव्हेंबर १९९७ रोजी तो हरवला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम america-google


२२ वर्षांपूर्वी विलियम एका क्लबमध्ये गेले होते आणि त्यानंतर ते कुणालाच दिसले नाहीत. दोन दशकांपर्यंत पोलिसांना विलियम यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. विलियम बेपत्ता झाले, तेव्हा त्यांचे वय ४० होते.

गुगलने असे काढले शोधून

अलीकडेच स्थानिक पोलिसांना एक दूरध्वनी आला. एका तलावात बेवारस वाहन असल्याची माहिती दूरध्वनी करणाऱ्याने दिली. पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला असता, त्यात विलियम यांच्या मृतदेहाचे अवशेष त्यांना मिळाले. 'गुगल अर्थ' वापरून या वाहनाचा शोध लावण्यात आला. २००७ मध्येही गुगल अर्थवर संबंधित वाहन दिसत होते. मात्र, त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, असा दावा करण्यात येत आहे. क्लबमधून येताना विलियम यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन तलावात गेले. त्याच तलावात बुडून विलियम यांचा मृत्यू झाला. यापूर्वीही गुगल अर्थच्या साहाय्याने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज