अ‍ॅपशहर

बँकवाले बाबू मेरा छुट्टा करा दे

नोटाबंदीचा झटका लागल्यानंतर सिनेमागृहं, नाट्यगृह ओस पडली असली, तरी सोशल मीडियावर मात्र यावरुन जोरदार मस्करी सुरू आहे. यावरुन केलेली गाणी, व्हीडिओजना हजारोंनी हिट्स मिळताना दिसतायत…

Maharashtra Times 22 Nov 2016, 11:27 am
Swapnil.Ghangale@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jokes on notes change
बँकवाले बाबू मेरा छुट्टा करा दे


Tweet : @swapnilcsgMT

मुंबई टाइम्स टीम

नोटाबंदीचा झटका लागल्यानंतर सिनेमागृहं, नाट्यगृह ओस पडली असली, तरी सोशल मीडियावर मात्र यावरुन जोरदार मस्करी सुरू आहे. यावरुन केलेली गाणी, व्हीडिओजना हजारोंनी हिट्स मिळताना दिसतायत…

‘डिजेवाले बाबू मेरा गाना बजा दे’ या गाण्याबद्दल आणि त्याच्या शब्दांबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगण्याच्या गरज नाही. याच गाण्याच्या चालीवर ‘बँकवाले बाबू जरा नोट तो बदलवा दे, जरा छुट्टा तो करा’ हे गाणं तयार करून ते व्हायरल झालं आहे. ‘पेन पायनॅपल साँग’च्या चालीवर ‘नो चेंज’ असं गाणंही चांगलंच व्हायरल झालं आहे. ‘आय गॉट फाइव्ह हंड्रेड…आय गॉट वन थाऊजंड बट नो चेंज’ असे या गाण्याचे शब्द असून नोटाबंदीनंतर आलेल्या अनेक अडचणी मजेशीर प्रकारे या गाण्यात मांडण्यात आल्या आहेत.

‘ए बिल है मुश्कील’ नावाचा स्पूफ व्हीडीओही नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला आहे. या व्हीडीओमध्ये रणबीर कपूर एक सामान्य माणूस दाखवण्यात आला आहे. अनुष्का जुन्या हजार रुपयाच्या नोटेच्या, तर ऐश्वर्या नवीन दोन हजाराच्या नोटेच्या भूमिकेत दिसतेय. नवीन नोटेसाठी वेडा झालेला सामान्य माणूस जुन्या नोटेला कसा नाकारतो या कथेवर हा ‘ए बिल है मुश्कील’ सिनेमा आधारित आहे. हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेमांच्या सिनेमांच्या दृश्यांत डबिंग करून नोटाबंदीसंदर्भात मजेदार कंटेंट व्हायरल केला जात आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे स्पूफ व्हीडीओज demonetization spoof videos असं सर्च केल्यावर सापडतात.

भोजपुरी सुसाट...

भोजपुरी सिनेमांच्या नावांवरुन त्यांची नेहमी मस्करी केली जाते. या नोटाबंदीच्या निर्णयानंतरही हे दिसून येतंय. अनेक स्थानिक गायकांनी तयार केलेल्या नोटाबंदी संदर्भातल्या गाण्यांची पोस्टर्स व्हायरल झाली आहेतच. शिवाय यातली काही गाणी युट्यूबवर उपलब्ध असून, आश्चर्य म्हणजे या गाण्यांना ९० हजारांच्या वर व्ह्यूज आहेत. ‘काला धन जी रखले होई के लागल दिल पे चोट’, ‘ पाच सौ हजार के नोट बंद भईल’, ‘बंद हुआ रूपय्या पाच-सौ हजार! छा गय मोदी सरकार’, ‘जोड जोड के पुराना धन जो करते थे बात बडी, मोदी ने करदी उनकी खाट’ असे शब्द असलेली गाणी सध्या युट्यूबवर हिट्स मिळवत आहेत. भोजपुरीबरोबरच पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांमधूनही या नोटाबंदीचं समर्थन मजेशीर प्रकारे करणारी गाणी तयार करण्यात आली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज