अ‍ॅपशहर

बनणार का पुतळा?

सोशल नेटवर्किंगवर कुठला चित्रविचित्र ट्रेंड व्हायरल होईल ते सांगता यायचं नाही. गेल्या वर्षी आइस बकेट चॅलेंज, हार्लिम शेक डान्स चॅलेंजनं धुमाकूळ घातल्यानंतर, सध्या असंच एक नवं चॅलेंज आलं आहे. ते आहे तुम्हाला पुतळा बनवणारं मॅनेक्वीन चॅलेंज…

Maharashtra Times 21 Nov 2016, 2:50 am
Swapnil.Ghangale@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manequeen challenge
बनणार का पुतळा?

Tweet : @swapnilcsgMT स्वप्निल घंगाळे

सोशल नेटवर्किंगवर कुठला चित्रविचित्र ट्रेंड व्हायरल होईल ते सांगता यायचं नाही. गेल्या वर्षी आइस बकेट चॅलेंज, हार्लिम शेक डान्स चॅलेंजनं धुमाकूळ घातल्यानंतर, सध्या असंच एक नवं चॅलेंज आलं आहे. ते आहे तुम्हाला पुतळा बनवणारं मॅनेक्वीन चॅलेंज…

कुठल्याही तयार कपड्यांच्या दुकानाबाहेर ठेवलेले पुतळे, म्हणजे मॅनेक्वीन तुम्ही पाहिले असतील. त्यांच्यासारखंच बनवणारं एक चॅलेंज, ‘मॅनेक्वीन चॅलेंज’ सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालतंय. ‘वेळ थांबला आहे’ असं दाखवत, बिलकूल न हलता उभं राहून त्याचा व्हिडीओ शूट करून तो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करायचा असं हे चॅलेंज आहे. हा व्हीडिओ पोस्ट करताना ‪#‎mannequinchallenge‬ हा हॅशटॅग वापरला जातोय.

कशी झाली सुरुवात?
दोन आठवड्यांपूर्वी फ्लोरिडामधल्या एका विद्यार्थ्याने हे पहिल्यांदा केलं होतं. आपल्या मित्रांबरोबर पुतळ्यांप्रमाणे पोझ देऊन तो उभा राहिला आणि तो छोटा व्हीडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून अनेकांनी अशाप्रकारचे व्हीडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. यातले अनेक व्हीडिओ रे-सर्मड यांच्या ब्लॅक बिटल्सच्या पार्श्वसंगीतावर शूट करून पोस्ट करण्यात आले आहेत. त्या दोघांनीही आपल्या कॉन्सर्टमधील असा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.

फुटबॉल, टेनिसस्टार्सही जोरात
स्वत:ला फ्रीज करून सोशल मीडियावर त्याचा व्हीडिओ पोस्ट करण्याच्या या ट्रेंडमध्ये अमेरिकच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन, बिल क्लिंटन, डेस्टिनिज चाईल्ड, पॉल मॅकार्टिन, अॅडले ही मोठी नावं आहेत. पुतळ्याप्रमाणे उभं राहून त्याचा व्हीडिओ शूट करण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही. पोर्तुगाल, मेक्सिको, जर्मनी यांच्या फुटबॉल संघांनी आपले मॅनेक्यू चॅलेंज व्हीडिओ पोस्ट केले आहेत. भारतातल्या केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबनेही आहे अशा प्रकारचा आपल्या खेळाडूंचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी तर स्पेनविरुद्ध गोल केल्यानंतर मॅनेक्यू पोज देतच सेलिब्रेशन केलं. टेनिस जगतातले मोठे स्टार्स मरे, जोकोव्हिचसहीत एटीपी स्टार्स स्पर्धेतल्या आठ बड्या टेनिस स्टार्सनी एकत्र येऊन अशाच प्रकारचा व्हीडिओ पोस्ट केला आहे.

कॉमेंट्री बॉक्समधले पुतळे
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये कपिल देव, संजय मांजरेकर, रवी शास्त्री आणि इतर माजी खेळाडूंनीही मॅनिक्यू व्हीडिओ शूट केला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत पेजवरून शेअर केलेल्या या व्हीडिओला १० हजाच्यावर लाइक्स मिळाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज