अ‍ॅपशहर

स्पेस जपायलाच हवी!

​ आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्स वापरतात? त्यांच्या गॅजेटसविषयी आठवणी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर मग ‘टेक टॉक’ या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी अशाच टेकफुल गप्पा मारणार आहोत. आज अभिनेत्री अभिज्ञा भावेशी टेक्नॉलॉजीबाबत साधलेला हा संवाद...

Maharashtra Times 27 Nov 2017, 6:10 pm
आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्स वापरतात? त्यांच्या गॅजेटसविषयी आठवणी जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर मग ‘टेक टॉक’ या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी अशाच टेकफुल गप्पा मारणार आहोत. आज अभिनेत्री अभिज्ञा भावेशी टेक्नॉलॉजीबाबत साधलेला हा संवाद...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need to save space abhidnya bhave
स्पेस जपायलाच हवी!


सध्या कोणता स्मार्टफोन वापरत आहेस?

सॅमसंग एस ७ एज

स्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतेस?

लॅपटॉप

सर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं?

बेसिक फोन. माझ्या पहिल्या पगारातून मी सोनी इरेक्सन हा फोन घेतला होता. त्याच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत.

कोणतं फिचर जास्त भावतं?

फोटो किंवा सेल्फी काढण्याची प्रचंड हौस असल्याने कॅमेऱ्याचं फिचर खूप आवडतं.

गॅजेटचा प्रभावी वापर झाला आहे असा क्षण कोणता?

मी गोष्टी चटकन विसरते. त्यामुळे कोणाचे वाढदिवस, काही नोट्स किंवा त्या दिवशी काही खास घडलं असेल त्या आठवणींची मी नोट्समध्ये नोंद करुन ठेवतो.

तुझा टेक्नॉलॉजीतला गुरू कोण?

माझे बाबा. त्यांनी मला कॉनटॅक्ट कसा सेव्ह करायचा, एखाद्याला कॉल कसा लावायचा इथपासून सगळं काही शिकवलं आहे.

वाचकांना काय टिप्स देशील?

गॅजेटचा कामापुरता वापर करा. वैयक्तिक आयुष्यातील स्पेस प्रत्येकाने जपायला हवीच. वापराचा अतिरेक करु नका. तुमच्या जवळच्या व्यक्तीला भेटल्यावर मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्याऐवजी सरळ मोबाइल बाजूला ठेवा.

सोशल साइट्सवर अॅक्टिव्ह आहेस का?

फेसबुक, इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे.

दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतेस?

रात्री दहा वाजता इंटरनेट बंद करते. त्यानंतर कोणाचे फोनही उचलत नाही. कारण रात्री दहा नंतरची वेळ ही माझी असते. कामामधून सवड मिळाली की अगदी थोडासा वेळ सोशल मीडियाला देते. पण मी स्वत:ला जे नियम घालून घेतलेत, ते मी कटाक्षाने पाळते.

संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज