अ‍ॅपशहर

ट्विटरवर फोटो स्टिकर

फोटो ट्विट करण्यातली गंमत अधिक वाढवण्यासाठी ट्विटरने सोमवारी नवे स्टिकर आणले आहे. ट्विटरवरील फोटोंना अधिक सजीव करण्यासाठी युजर्स ही स्टिकर्स वापरू शकतात.

Maharashtra Times 28 Jun 2016, 3:49 am
लॉस एंजेलिस : फोटो ट्विट करण्यातली गंमत अधिक वाढवण्यासाठी ट्विटरने सोमवारी नवे स्टिकर आणले आहे. ट्विटरवरील फोटोंना अधिक सजीव करण्यासाठी युजर्स ही स्टिकर्स वापरू शकतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम photo sticker on twitter
ट्विटरवर फोटो स्टिकर


ट्विटरवर प्रत्यक्ष संवाद साधत असताना हे स्टिकर्स वापरता येतील. त्यासाठी ट्विटरने अक्षरशः शेकडो पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यात अॅक्सेसरीज, ईमोजी आणि प्रॉप्सचा समावेश आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक ​स्टिकरही वापरता येतील. त्यांचा आकार वाढवता येईल किंवा तुमच्या फोटोवर हव्या त्या ठिकाणी ती फिरवताही येतील.

आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर काही आठवड्यांतच हा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. Twitter.com. #Stickers या ठिकाणी जाऊन याविषयी अधिक माहिती घेता येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज