अ‍ॅपशहर

टिकटॉकला टक्कर देण्यासाठी 'हे' करणार फेसबुक

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीच्या भवितव्याबाबत अलीकडेच एक चर्चा समोर आली आहे. द वर्जमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार इतर चर्चेव्यतिरिक्त टिकटॉकविषयी झुकरबर्ग यांना असलेला चिंता हाही चर्चेतला एक प्रमुख मुद्दा होता. शिवाय भारत यात कितपत प्रभावी भूमिका निभावतो हा विषयही निघाला. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय टिकटॉकमुळे फेसबुकच्या वाढत्या टेंशनविषयी आणि त्याला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आखलेल्या योजनेविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2019, 1:00 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fb-tiktok

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीच्या भवितव्याबाबत अलीकडेच एक चर्चा समोर आली आहे. द वर्जमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार इतर चर्चेव्यतिरिक्त टिकटॉकविषयी झुकरबर्ग यांना असलेला चिंता हाही चर्चेतला एक प्रमुख मुद्दा होता. शिवाय भारत यात कितपत प्रभावी भूमिका निभावतो हा विषयही निघाला. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय टिकटॉकमुळे फेसबुकच्या वाढत्या टेंशनविषयी आणि त्याला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आखलेल्या योजनेविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी.

चीनचं पहिलं चांगलं कन्झ्युमर इंटरनेट प्रोडक्ट
फेसबुकच्या सीईओंनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की चीनच्या टेक कंपन्या खूप मेहनत करत आहेत. पण टिकटॉक चीनच्या एका दिग्गज टेक कंपनीने बनवलेलं पहिलं असं कन्झ्युमर प्रोडक्ट आहे, जे जगभरात चांगलं फॉर्मात आहे.

भारतात वाढ

वर्जच्या अहवालानुसार, झुकरबर्ग यांनी टिकटॉकविषयी सांगताना भारताचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की भारतात टिकटॉक वेगाने वाढत आहे. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे.

भारतातील वाढीविषयी चिंता

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारतीय तरुण-तरुणींमध्ये टिकटॉकविषयी असलेली क्रेझ पाहता चिंता वाटत आहे. टिकटॉकने हळूहळू इन्स्टाग्रामला मागे टाकले आहे.

इन्स्टाग्रामच्या एका फिचरसारखं टिकटॉक

झुकरबर्गने सांगितलं की टिकटॉक इन्स्टाग्रामच्या केवळ एका फिचर 'एक्सप्लोर' टॅब प्रमाणे आहे.

भारतात फेसबुकला द्यायचीय टिकटॉकशी टक्कर

वर्जच्या अहवालानुसार, फेसबुक आणि झुकरबर्ग टिकटॉकला टक्कर देण्याची योजना आखत आहेत. ज्या देशांमध्ये टिकटॉक जास्त पॉप्युलर आहे, तेथे फेसबुक टिकटॉकशी भिडणार आहे. या देशांमध्ये अर्थात भारताचा समावेश आहे.

फेसबुककडे वेळ आहे

झुकरबर्ग यांना वाटतंय की फेसबुककडे अजूनही याचा अभ्यास करायला खूप वेळ आहे की भारतासारख्या ठिकाणी टिकटॉकची क्रेझ का आहे.

टिकटॉकविषयी काय वाटतं झुकरबर्ग यांना

वर्ज की रिपोर्टनुसार, झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की 'मी टिकटॉकविषयी असा विचार करतो की या स्टोरीजसाठी एक्सप्लोर (इन्स्टाग्रामचं एक फिचर) केला गेलेला एक पूर्ण अॅप हवा.'

टिकटॉकवर अटॅकविषयी विचारलं गेलं

या चर्चेच्या वेळी झुकरबर्ग यांना टिकटॉकशी टक्कर देण्याच्या कंपनीच्या प्लानविषयी विचारलं गेलं.

टिकटॉकसाठी फेसबुकचं उत्तर 'Lasso'

फेसबुकच्या सीईओने कर्मचाऱ्यांना सांगितलं की आमच्याकडे Lasso नावाचं प्रोडक्ट आहे. हे एक स्टँडअलोन अॅप आहे, ज्यावर आम्ही काम करत आहोत. याची सुरुवात मॅक्सिकोहून होईल.

यूएसमध्येही पॉप्युलर

झुकरबर्गनुसार, टिकटॉक यूएसमध्येदेखील तरुणांमध्ये खूप पॉप्युलर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज