अ‍ॅपशहर

जिओनीचा २० मेगापिक्सलचा सेल्फी फोन

स्मार्टफोन बनवणारी कंपनी जिओनीने भारतात आपला नवा डिव्हाईस 'A1 लाइट' हा मोबाईल बाजारात उतरवला आहे. या फोनची वैशिष्ट्ये म्हणजे यात २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि ४०००mAh बॅटरी आहे.

Maharashtra Times 10 Aug 2017, 11:31 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a1 lite with 20mp selfie camera in budget smartphone range
जिओनीचा २० मेगापिक्सलचा सेल्फी फोन


स्मार्टफोन बनवणारी कंपनी जिओनीने भारतात आपला नवा डिव्हाईस 'A1 लाइट' हा मोबाईल बाजारात उतरवला आहे. या फोनची वैशिष्ट्ये म्हणजे यात २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि ४०००mAh बॅटरी आहे.

जिओनीनं याआधी A1 आणि A1 प्लस स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. 'A1 लाइट' म्हणजे या दोन्ही फोनचे हलके व्हर्जन आहे. या फोनमध्ये ५.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फ्रंट व बॅक दोन्ही कॅमेऱ्यात LED फ्लॅश आहे. फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं १२८ जीबीपर्यंत ती वाढवता येऊ शकते. जिओनी 'A1 लाइट' मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे. जिओनीनं या फोनच्या डिव्हाईसचे फिंगरप्रिंट सेन्सर पाठीमागे दिले आहे.

जिओनीनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेल आणि पेटीएमसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी काही खास ऑफर आहेत. एअरटेलकडून ग्राहकांना फोन खरेदी केल्यानंतर १० जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. यासाठी त्यांना १ जीबी किंवा त्यापेक्षा डेटाचा रिचार्ज करावा लागेल. तसेच ग्राहकांना २५० रुपयांचा पेटीएम कॅशबॅक व्हाऊचर मिळेल. १० ऑगस्टपासून हा मोबाईल दुकानात उपलब्ध असून त्याची किंमत १४,९९९ रुपये इतकी ठेवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज