अ‍ॅपशहर

आयफोन- ८ कडे पाठ; अॅपलचे शेअर्स घसरले

आयफोनमुळे स्मार्टफोनच्या बाजारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या अॅपलला काहीसा धक्का बसला आहे. आज प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये अॅपलच्या शेअर्समध्ये १.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लसला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने व विक्रीत घट झाल्यानेच अॅपलचे शेअर्स घसरल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Times 19 Oct 2017, 6:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम apple shares drop on iphone 8 demand worries
आयफोन- ८ कडे पाठ; अॅपलचे शेअर्स घसरले

आयफोनमुळे स्मार्टफोनच्या बाजारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या अॅपलला काहीसा धक्का बसला आहे. आज प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये अॅपलच्या शेअर्समध्ये १.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लसला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने व विक्रीत घट झाल्यानेच अॅपलचे शेअर्स घसरल्याचे सांगितले जात आहे.

रॉयटर्सने तैवानमधील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत अॅपलने नुकत्याच बाजारात आणलेल्या आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस या दोन मोबाइल्सची मागणी घटल्याचे म्हटले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या पुढील दोन महिन्यांत ऑर्डर्स ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे. याबाबत रॉयटर्सने कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिक्रियेसाठी कुणीही उपलब्ध होऊ शकलं नाही.

विशेष म्हणजे, आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लसची प्री-बुकिंग गेल्यावर्षी लॉन्च करण्यात आलेल्या आयफोन-७ आणि आयफोन-७ प्लसपेक्षा ५० टक्क्याने कमी असल्याचे वृत्त गेल्याच महिन्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये आयफोन- एक्स बाजारात येणार असल्याने आयफोन-८ला कमी प्रतिसाद मिळत आहे, असेही तेव्हा मोबाइल रिटेलर्स म्हणत होते. आता एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज