अ‍ॅपशहर

डिजिटली स्मार्ट व्हा!

आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्स वापरतात? त्यांच्या गॅजेटसविषयी आठवणी हे जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर मग ‘टेक टॉक’ या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी अशाच टेकफुल गप्पा मारणार आहोत. अभिनेता गौरव घाटणेकरशी टेक्नॉलॉजीबाबत साधलेला हा संवाद...

Maharashtra Times 18 Dec 2017, 12:42 am
आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्स वापरतात? त्यांच्या गॅजेटसविषयी आठवणी हे जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर मग ‘टेक टॉक’ या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी अशाच टेकफुल गप्पा मारणार आहोत. अभिनेता गौरव घाटणेकरशी टेक्नॉलॉजीबाबत साधलेला हा संवाद...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम be smart digitally
डिजिटली स्मार्ट व्हा!


सध्या कोणता स्मार्टफोन वापरतोयस?

आयफोन ८

स्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतोस?

टॅब

सर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं?

कम्प्युटर

कोणतं फिचर जास्त भावतं?

कॅमेरा

गॅजेटचा प्रभावी वापर झाला आहे असा क्षण कोणता?

एखाद्याच्या वाढदिवशी त्यांच्या फोटोंचा व्हिडीओे बनवून त्या व्यक्तीला तो पाठवायला मला खूप आवडतं. माझ्या बायकोच्या म्हणजेच श्रुती मराठेच्या वाढदिवशीही मी असाच व्हिडीओ केला होता. त्यावेळी टेक्नॉलॉजीची खूप मदत झाली होती.

तुझा टेक्नॉलॉजीतला गुरू कोण?

अर्थात माझी बायको श्रुती मराठे

वाचकांना काय टिप्स देशील?

नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करुन घ्या. मी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अपडेटेड नसतो. पण वेळ मिळाला की मी ते माहीत करुन घेतो. माझ्या फॅन्सनाही माझं हेच सांगणं आहे की, डिजिटली स्मार्ट व्हा. ती काळाची गरज आहे.

सोशल साइट्सवर अॅक्टिव्ह आहेस का?

हो, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यावर मी बऱ्यापैकी अॅक्टीव्ह आहे.

दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतोस?

दिवसातला अर्धा तास मी सोशल मीडियासाठी देतो. मग ते फॅन्सना काही सांगणं असो किंवा त्यांच्या मेसेजना रिप्लाय देणं असो, यावेळेत मी करतो.

संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज