अ‍ॅपशहर

अपडेटेड राहा!

आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्‍स वापरतात? त्यांच्या गॅजेटविषयी आठवणी वाचायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. वाचकहो, टेक टॉक या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी टेकफुल गप्पा मारणार आहोत.

Maharashtra Times 3 Dec 2017, 11:33 pm
आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्‍स वापरतात? त्यांच्या गॅजेटविषयी आठवणी वाचायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. वाचकहो, टेक टॉक या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी टेकफुल गप्पा मारणार आहोत. आज अभिनेत्री राधिका देशपांडे हिच्याशी टेक्नॉलॉजी विषयावर मारलेल्या गप्पा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम be updated
अपडेटेड राहा!


सध्या कोणता स्मार्टफोन वापरत आहेस?

आयफोन ६ एस

स्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरते?

लॅपटॉप

सर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं?

बेसिक फोन

कोणतं फिचर जास्त भावतं?

कुठे फिरायला गेल्यावर तिथला नयनरम्य निसर्ग आणि अनोख्या गोष्टी टिपायला खूप आवडतात. त्यामुळे मोबाइलमधील कॅमेऱ्याचं फिचर खूप आवडतं.

गॅजेटचा प्रभावी वापर झाला आहे असा क्षण कोणता?

मी नेहमी पुणे-मुंबई-पुणे असा चारचाकीने प्रवास करते. गाडी चालवताना मोबाइल वापरु शकत नाही. अशावेळी व्हॉइस नोटचा उपयोग होतो.

तुझा टेक्नॉलॉजीतला गुरू कोण?

माझा नवरा

वाचकांना काय टिप्स देशील?

टेक्नॉलॉजी हाताळायला जमत नाही म्हणून त्यापासून पळून जाऊ नका. नवनवीन गोष्टी शिकत राहा. अपडेटेड राहा.

सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह आहेस का?

नाही. गेलं एक वर्ष मी या सगळ्यापासून लांब आहे.

संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज