अ‍ॅपशहर

Best of 2020: ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे टॉप ३ स्मार्टफोन, किंमत १८ हजारांपेक्षा कमी

बेस्ट कॅमेऱ्याचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल आणि तोही स्वस्त किंमतीत. तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा तीन स्मार्टफोनची नावे सांगणार आहोत. या तिन्ही स्मार्टफोनची किंमत १८ हजार रुपयांपेक्षा कमी असून या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2020, 6:29 pm
नवी दिल्लीः युजर्संना सध्या बेस्ट कॅमेराचा स्मार्टफोन जास्त आवडत आहेत. त्यामुळे अनेक जण अशा फोनच्या शोधात असतात. कंपन्या सुद्धा युजर्संची मागणी लक्षात घेवून असे फोन बनवत असतात. जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे सेटअपचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ६४ कॅमेऱ्याच्या फोनसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. परंतु, काही कंपन्यांनी स्वस्त किंमतीत बेस्ट कॅमेराचे फोन उपलब्ध केले आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २०२० मधील टॉप ३ स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Redmi Note 9 Pro Max


वाचाः भारतातील २०२० मधील हे आहेत बेस्ट स्मार्टफोन्स, फीचर्स पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

रेडमी नोट ९ प्रो मॅक्स
६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत अॅमेझॉनवर १६ हजार ९९९ रुपये आहे. स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

वाचाः 6GB रॅमसोबत Oppo A53 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

मोटोरोला वन फ्यूजन प्लस
मोटोरोलाच्या या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. तसेच एक ८ मेगापिक्सलचा, एक ५ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे.

वाचाः पुढीलवर्षीपासून या स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, जाणून घ्या डिटेल्स

सॅमसंग गॅलेक्सी F41
सॅमसंगच्या या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज या फओनमध्ये दिला आहे. ६.४ इंचाचा सुपर इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे.

वाचाः सॅमसंगच्या या फोनमध्ये 12GB रॅम आणि Exynos 2100 प्रोसेसर, जानेवारीत लाँचिंग

वाचाः Amazon वर ख्रिसमस सेल, 'या' स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपवर डिस्काउंट

वाचाः OnePlus चा 7th Anniversary Sale, स्मार्टफोनसोबत अन्य प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट

वाचाः सॅमसंगचा चीनला जोरदार झटका, भारतातील 'या' शहरात शिफ्ट करणार डिस्प्ले फॅक्ट्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज