अ‍ॅपशहर

सावधानः व्हॉट्सअॅपवरचा 'तो' मेसेज उघडू नका!

व्हॉट्सअॅप यूजर्सची संख्या कोटींच्या घरात असल्यानं हॅकर्स आणि फ्रॉड करणाऱ्यांने आपला मोर्चा व्हॉट्सअॅपकडे वळवला आहे. बँक खात्यांची माहिती सहज मिळावी व त्यावर डल्ला मारता यावा यासाठी हॅकर्सकडून पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 10:22 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beware this whatsapp message can steal your bank details
सावधानः व्हॉट्सअॅपवरचा 'तो' मेसेज उघडू नका!


व्हॉट्सअॅप यूजर्सची संख्या कोटींच्या घरात असल्यानं हॅकर्स आणि फ्रॉड करणाऱ्यांने आपला मोर्चा व्हॉट्सअॅपकडे वळवला आहे. बँक खात्यांची माहिती सहज मिळावी व त्यावर डल्ला मारता यावा यासाठी हॅकर्सकडून पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅपवर लोकांना एक मेसेज येत असून ज्यात लिहिले आहे की, तुमचे एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन संपणार आहे. पुढील सेवा सुरू ठेवण्यासाठी पेमेंट करा, असा हा मेसेज आहे. या मेसेजखाली एक लिंकही दिली आहे. ज्यावर क्लिक केल्यावर एक पेमेंट पेज उघडले जाते. या पेमेंट पेजवर तुमची बँक डिटेल्सची माहिती भरण्यास सांगितली जाते. परंतु व्हॉट्सअॅपने अशी कोणतीही लिंक दिली नसून व्हॉट्सअॅपची अशी कोणतीही मागणी नाही.

हा सर्व प्रकार म्हणजे या पेमेंटच्या नावाखाली तुमच्या बँक खात्यातील माहिती चोरण्यासाठी हॅकर्सने अवलंबिलेला नवा फंडा आहे. ही लिंक उघडली किंवा त्या ठिकाणी माहिती भरल्यास तुमची बँक खात्याची माहिती हॅकर्सच्या हाती लागू शकते, त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करणे योग्य होय. सध्या हे मेसेज 'यूके'च्या लोकांनाच येत आहेत. परंतु असे मेसेज भारतातील लोकांनाही येवू शकतात. दरम्यान, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर फ्री सर्विस दिल्यानंतर लोकांना पैसे द्यावे लागतील अशी घोषणा व्हॉट्सअॅपने केली होती परंतु जानेवारी २०१६ मध्ये ही घोषणा व्हॉट्सअॅपकडून रद्द करण्यात आलेली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज