अ‍ॅपशहर

तांत्रिक त्रुटी दूर; सप्टेंबरमध्ये 'गॅलेक्सी फोल्ड'चं लाँचिंग

सॅमसंगचा 'गॅलेक्सी फोल्ड' हा बहुचर्चित स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात बाजारात येणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. जून महिन्यात हा फोन बाजारात आणण्याची घोषणा कंपनीनं केली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचं लाँचिंग लांबणीवर पडलं. हे तांत्रिक अडथळे आता दूर करण्यात कंपनीला यश आलं असून 'गॅलेक्सी फोल्ड' फोन लाँचिंगसाठी तयार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2019, 12:37 pm
सॅमसंगचा 'गॅलेक्सी फोल्ड' हा बहुचर्चित स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात बाजारात येणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. जून महिन्यात हा फोन बाजारात आणण्याची घोषणा कंपनीनं केली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचं लाँचिंग लांबणीवर पडलं. हे तांत्रिक अडथळे आता दूर करण्यात कंपनीला यश आलं असून 'गॅलेक्सी फोल्ड' फोन लाँचिंगसाठी तयार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम galaxy fold is now fixed and will be released in september says samsung
तांत्रिक त्रुटी दूर; सप्टेंबरमध्ये 'गॅलेक्सी फोल्ड'चं लाँचिंग

वर्षाच्या सुरुवातीलाच 'गॅलेक्सी फोल्ड' लाँच करण्यात येणार होता. मात्र, फोन फोल्ड करताना स्क्रिन तुटू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या. यानंतर फोनचं लाँचिंग पुढं ठकलण्यात आलं होतं. या तांत्रिक त्रुटीवर तातडीनं काम सुरू करण्यात आलं. ऑगस्ट महिन्याच्या ७ तारखेपर्यंत फोन बाजारात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर फोनच्या लाँचिंगसाठी आणखी वाट पाहावी लागणार असून सप्टेंबर महिना उजाडणार आहे.

'गॅलेक्सी फोल्ड' बाबत अधिक माहिती समोर आलेली नसली तरी या फोनला ६.७ इंचाचा डिस्प्ले असेल, असे समजते.

फोनची वैशिष्ट्ये:
  • ऑक्टा कोर परफॉर्मन्स
  • १२ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेज
  • ४३८० एमएएच बॅटरी क्षमता
  • ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज