अ‍ॅपशहर

ॲन्ड्रॉईड युजर्सवर Damm मालवेअर व्हायरसचा धोका, सरकारनं जारी केला अलर्ट

Damm Malware : भारताच्या सायबर सिक्योरिटी एजन्सी CERT-IN ने एका नव्या मालवेअर Damm बद्दल एक मार्गदर्शनक सूचना जारी केली आहे. हा मालवेअर युजर्सचा खाजगी डेटा चोरत असल्याचं म्हटलं आहे.

Authored byशशांक पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2023, 3:16 pm
नवी दिल्ली : CERT-IN Warns About Malware : आयओएस अर्थात ॲपल फोन्सच्या तुलनेत ॲन्ड्रॉईड फोन्समध्ये सिक्योरिटी तितकी अधिक नाही. याचे कारण ॲन्ड्रॉईडमध्ये युजर्सना जास्त सूट मिळते. म्हणजे कोणतंही ॲप कुठूनही डाऊनलोड करता येतं. पण यामुळे सिक्योरिटीचा धोका निर्माण होत असून आताही भारताच्या सायबर सिक्योरिटी एजन्सी CERT-IN ने एका नव्या मालवेअर Damm च्या धोक्याबद्दल सांगितलं आहे. हा मालवेअर युजर्सचा खाजगी डेटा चोरत असल्याचं म्हटलं असून ॲन्ड्रॉईड युजर्सना याचा धोका आहे. चलातर जाणून घेऊ नेमका धोका काय आहे? आणि यापासून कसं सावध राहता येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Android Users News


किती धोकादायक आहे Damm मालवेअर?

तर भारताच्या सायबर सिक्योरिटी एजन्सी CERT-IN ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा व्हायरस स्प्रेड करण्यासाठी अनऑथराईज्ड सोर्स आणि थर्ड पार्टी वेबसाईट्सवरुन डाऊनलोड केलेल्या ॲप्समधून हा मालवेअर फोनमध्ये इंजेक्ट होत आहे. विशेष म्हणजे हा अँटिव्हायरस प्रोग्रामलाही बायपास करत असल्याचं समोर आल्यामुळे अधिक धोका वाढला आहे.

या मालवेअरमुळे नेमकं काय होतं?
तर हा Damm मालवेअर डिव्हाईमध्ये पोहचताच सर्वात आधी काय सिक्योरिटी बायपासला चेक करतं त्यातून जर व्हायरस पकडला गेला नाही तर त्यानंतर फोनमधला डेटा थेट चोरी करतं. यामध्ये रिडींग हिस्ट्री, कॉल लॉग, बुकमार्क, एसएमएस चोरी असं सर्व हॅक होतं. तुमच्या फोनचा पासवर्डही या अॅपद्वारे हॅक होतो. ज्यानंतर तुमचा फोन रेकॉर्ड होऊ शकतो, किंवा स्क्रिन कॅप्चर होऊ शकते.

या मालवेअरपासून वाचण्यासाठी काय कराल?

सर्वात आधी म्हणजे कोणतंही ॲप डाऊनलोड करताना तुमच्या फोनच्या अधिकृत प्ले स्टोअरमधूनच डाऊनलोड करा.
कधीही नवीन ॲप किंवा गेम डाऊनलोड करताना युजर रेटिंग आणि रिव्ह्यू चेक करा
कधीही एसएमएस, ईमेल किंवा डीएममधून आलेल्या अनोळखी लिंकद्वारे आलेल्या अनऑथोराईज्ड लिंकवर क्लिक करु नका.
कोणत्याही अनोळखी आणि संशयित लिंक किंवा युआरएलला भेट देऊ नका.
अँटिव्हायरस कायम अपडेटेड ठेवा


वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब
लेखकाबद्दल
शशांक पाटील
शशांक पाटील हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रिंट, टीव्ही चॅनेल आणि डिजिटल मीडियाचा ५ वर्षाहून जास्त अनुभव आहे. बातम्या, लेख लिहिण्यासह व्हिडीओ ब्रिफिंग करण्याचं त्यांना विशेष कौशल्य प्राप्त आहे. सध्या ते टेक आणि ऑटो सेक्शन संबधित बातम्या करत आहेत. त्यांचं क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व आहे. भटकंतीसह फुटबॉल, क्रिकेट या मैदानी खेळांची त्यांना विशेष आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज