अ‍ॅपशहर

Apple iPhone 12 च्या डिस्प्लेत हा प्रोब्लेम सुरू, युजर्स झाले चिंताग्रस्त

प्रसिद्ध अॅपल कंपनीने आपली आयफोन १२ सीरीज नुकतीच लाँच केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने ४ आयफोन लाँच केले आहेत. फोनची विक्री सुरू झाली असून जगभरातील चाहत्यांनी आयफोन खरेदी केले आहेत. परंतु, या आयफोनमध्ये एक समस्या येत असल्याचे युजर्संनी म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2020, 6:36 pm
नवी दिल्लीः कॅलिफोर्नियाची टेक कंपनी अॅपलकडून नुकतीच आयफोन १२ सीरीज लाँच करण्यात आली आहे. या आयफोनची विक्री सुरू झाली आहे. नवीन आयफोन्समध्ये अॅपल OLED डिस्प्ले सेरेमिक शील्ड प्रोटेक्शन सोबत आहे. आयफोन १२ च्या डिस्प्लेत ग्रीन टिंटचा प्रोब्लेम येत असल्याची युजर्संनी तक्रार केली आहे. आयफोन १२ च्या युनिट्सच्या डिस्प्लेत हिरवा-हिरवा शेड युजर्संना दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Apple iPhone 12


वाचाः Whatsapp वर नवे फीचर, व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल

कोणत्याही नवीन स्मार्टफोन किंवा नवीन डिव्हाईसमध्ये बग्स किंवा प्रोब्लेम येत असतात. अनेक आयफोन १२ युजर्संनी ऑनलाइन चॅनेल्स तसेच सोशल मीडियावर डिस्प्ले संबंधी येत असलेला प्रोब्लेम शेयर करीत या संबंधी लिहिले आहे. तसेच यासंबंधीचे फोटो शेयर केले आहेत. अनेकदा डिस्प्लेमध्ये ग्रीन टिंट शिवाय फ्लिकर्स सुद्धा दिसत आहे. हळू हळू ते वाढत जात आहेत. स्वतः अॅपलने याला फिक्स करण्यासाठी काम सुरू केले आहे. अॅपल सपोर्ट कम्यूनिटिज पेजवर यासंबंधी पोस्ट पाहता येवू शकतात.

वाचाः वोडाफोन-आयडियाचा स्वस्त प्लान, २६९ रुपयांत ५६ दिवसांची वैधता

सॉफ्टवेयर अपडेटशी होणार फिक्स

9to5Mac च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एक अधिकृत अॅपल डॉक्यूमेंट समोर आले आहे. याला कंपनीकडून अॅपल ऑथराइज्ड सर्विस प्रोव्हाइडर्सला नुकतेच पाठवण्यात आले आहे. या डॉक्यूमेंटमध्ये म्हटले आहे की, ग्रीन टिंटचा प्रॉब्लेम येत असल्यास आयफोन युनिट्सला रिपेयर करू नका. अॅपलकडून सांगण्यात आले आहे की, ग्राहकांनी आयफोन १२ चे सॉफ्टवेयर अप टू डेट ठेवण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ अॅपलकडून या प्रॉब्लेमला फिक्स रोलआउट केले जावू शकते.

वाचाः सावधान! 'यू मे नो दीज पीपल' असा मेसेज फेसबुकवर दिसतो का?

अनेक फोन्समध्ये आली ही अडचण
अॅपलच्या आयफोन १२ शिवाय वनप्लसच्या नवीन फ्लॅगशीप लाइन अप आणि सॅमसंगच्या प्रीमियम फोन्समध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे. जास्तीत जास्त डिव्हाईसेज मध्ये ब्राईटनेस कमी केल्यानंतर डिस्प्लेत ग्रीन टिंट दिसतात. आयफोन मध्ये सुद्धा ९० टक्के ब्राईटनेस कमी केल्यानंतर युजर्संना ग्रीन टिंट दिसते.

वाचाः ५ वर्ष जुन्या सॅमसंगच्या या ४ फोन्सला मिळाले नवीन अपडेट, युजर्संना आश्चर्याचा धक्का

वाचाः Whatsapp मध्ये नवीन फीचर, आता नापसंत मेसेजपासून सुटका

वाचाः Mi, Redmi आणि Poco च्या स्मार्टफोनमध्ये आली ही समस्या, युजर्संची सोशलवर तक्रार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज