अ‍ॅपशहर

'जिओ'चा 4जी फिचर फोन @ १००० ₹

4जी डेटा आणि कॉलिंग मोफत देऊन मोबाइलप्रेमींना 'याड' लावल्यानंतर, आता रिलायन्सनं 4जी फिचर फोनची तयारी सुरू केली आहे. सुखद धक्का म्हणजे, या फोनची किंमत फक्त एक ते दीड हजार रुपये असेल. आज सगळ्यात स्वस्त 4जी स्मार्टफोनची किंमत ३ हजार रुपये आहे.

Maharashtra Times 16 Nov 2016, 2:22 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jio to launch smartphones starting at rs 1000
'जिओ'चा 4जी फिचर फोन @ १००० ₹


4जी डेटा आणि कॉलिंग मोफत देऊन मोबाइलप्रेमींना 'याड' लावल्यानंतर, आता रिलायन्सनं 4जी फिचर फोनची तयारी सुरू केली आहे. सुखद धक्का म्हणजे, या फोनची किंमत फक्त एक ते दीड हजार रुपये असेल आणि त्यासोबत ग्राहकांना अमर्याद व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग, तसंच इंटरनेट डेटाही अगदी माफक दरात दिला जाणार आहे.

आज सगळ्यात स्वस्त 4जी स्मार्टफोनची किंमत ३ हजार रुपये आहे. परंतु, 'दुनिया हिला देंगे हम' म्हणतच बाजारात उतरलेल्या 'रिलायन्स जिओ इन्फोकॉम'नं ही समीकरणं बदलून टाकायचा जणू चंगच बांधलाय. कमीत कमी वेळेत दहा कोटी यूजर्सचं लक्ष्य त्यांना गाठायचंय. अडीच महिन्यांत त्यांनी अडीच कोटी यूजर्सना 'मुठ्ठी'त घेतलं असून आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करायचं ठरवलंय. त्यासाठीच ते व्हॉइस ओव्हर एलटीई (VoLTE) तंत्रज्ञानावर आधारित फिचर फोन बाजारात आणणार आहेत. त्यातील बेसिक फोन एक हजार रुपयांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

रिलायन्सच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एक हजार आणि दीड हजार रुपये किंमत असलेल्या दोन फीचर फोनच्या निर्मितीचं काम सध्या सुरू आहे. हे दोन्ही फोन जानेवारी ते मार्चदरम्यान लाँच केले जाऊ शकतात. ते स्मार्टफोनप्रमाणेच काम करतील, फक्त टचस्क्रीन नसतील. पहिल्यांदाच इंटरनेट वापरणाऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही, इतकी सोपी फिचर या फोनमध्ये दिली जाणार आहेत.

जिओनं एक हजार रुपयांत VoLTE फिचर फोन आणल्यास बाजारात अक्षरशः 'कल्ला' होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज