अ‍ॅपशहर

जिओ फोन बुक केलाय?... मग वाट बघा!

रिलायन्सचा जिओ फोन कधी हातात येतो, याची आतुरतेनं वाट बघणाऱ्या मोबाइलप्रेमींसाठी बॅड न्यूज आहे. जिओ फोनच्या डिलिव्हरीच तारीख रिलायन्सनं पुढे ढकलली आहे. मात्र त्याचवेळी, आपला मोबाइल कुठपर्यंत आलाय, हे पाहण्याची सोय कंपनीने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

Maharashtra Times 21 Sep 2017, 3:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jiophone deliveries delayed by 10 days heres how to track your order
जिओ फोन बुक केलाय?... मग वाट बघा!

रिलायन्सचा जिओ फोन कधी हातात येतो, याची आतुरतेनं वाट बघणाऱ्या मोबाइलप्रेमींसाठी बॅड न्यूज आहे. जिओ फोनच्या डिलिव्हरीच तारीख रिलायन्सनं पुढे ढकलली आहे. मात्र त्याचवेळी, आपला मोबाइल कुठपर्यंत आलाय, हे पाहण्याची सोय कंपनीने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

जिओ फोनचं प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांना २१ सप्टेंबरपासून मोबाइल मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती सुरुवातीला मिळाली होती. त्यामुळे नवरात्रीत आपल्या हाती हा 'चकटफू' फोन पडेल, अशी आशा सगळेच बाळगून होते. मात्र आता फोनची डिलिव्हरी १ ऑक्टोबरपासून सुरू करायचं कंपनीनं निश्चित केलंय.

जिओ फोनसाठी प्री-बुकिंग २४ ऑगस्टला सुरू करण्यात आलं होतं. परंतु, नोंदणी आवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून कंपनीला दोनच दिवसांत ही प्रक्रिया थांबवावी लागली होती.

या पार्श्वभूमीवर, आता जिओ फोनची डिलिव्हरीही लांबलीय. मात्र, ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीनं एक फोन नंबर दिला आहे. त्यावर त्यांना आपल्या फोनचं 'बुकिंग स्टेटस' कळू शकेल. तसंच, 'माय जिओ' अॅपवरही याबाबतची माहिती ते मिळवू शकतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज