अ‍ॅपशहर

स्काईपचं नवं व्हर्जन वाचवणार मोबाईल डाटा

मायक्रोसॉफ्टने स्काईपचं नवं व्हर्जन 'स्काईप लाईट' भारतात लॉन्च केलं आहे. भारतीय ग्राहकांना समोर ठेवूनच हे नवं व्हर्जन तयार करण्यात आलं असून त्यामुळे मोबाईलचा इंटरनेट डाटा मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

Maharashtra Times 22 Feb 2017, 3:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम microsoft launches skype lite for india
स्काईपचं नवं व्हर्जन वाचवणार मोबाईल डाटा


मायक्रोसॉफ्टने स्काईपचं नवं व्हर्जन 'स्काईप लाईट' भारतात लॉन्च केलं आहे. भारतीय ग्राहकांना समोर ठेवूनच हे नवं व्हर्जन तयार करण्यात आलं असून त्यामुळे मोबाईलचा इंटरनेट डाटाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी 'फ्युचर डिकोडेड' परिषदेत ही माहिती दिली. भारतीय ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करूनच हे 'स्काईप लाईट' व्हर्जन तयार करण्यात आलं आहे. 'स्काईप लाईट'ला आधार कार्डाशी जोडण्यात आले आहे. त्याचे 'ईकेवायसी'द्वारे चॅटचे व्हेरिफिकेशन करता येऊ शकते. या नव्या व्हर्जनमध्ये चॅट संपल्यानंतर आधार कार्डची डिटेल आपोआप डिलिट होण्याची सुविधाही देण्यात आली असल्याचे सत्या म्हणाले. ऑनलाइन मुलाखतीसाठी हे फिचर अत्यंत उपयोगाचे ठरणार आहे. हे नवे अॅप्लिकेशन १३ एमबीचे असून २जी आणि ३जी कनेक्टिव्हिटीमध्येही त्यात अत्यंत वेगाने काम करता येऊ शकते. मेसेजिंग आणि कॉलिंगची सुविधाही या अॅपमध्ये देण्यात आली आहे.

याशिवाय मेसेज सेक्शनमध्ये स्काईप मेसेज, एसएमएस आणि प्रोफेशनल मेसेजही करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मेसेजिंगमध्ये फोटो पाठविण्याची सुविधाही देण्यात आली आहे. कॉलिंगमध्ये फोन कॉल आणि स्काईप कॉल फिल्टर करण्याची सुविधाही त्यात देण्यात आली आहे. याशिवाय भारतीय मानसिकता समोर ठेऊन खास चॅटबॉट विकसित करण्यात आले असून अजूनही त्यात सुधारणा करण्यात येत आहे. थोडक्यात ग्राहकांचा मोबाईल डाटा कमीत कमी कसा खर्च होईल याची पुर्ण काळजी या नव्या व्हर्जनमध्ये घेण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज