अ‍ॅपशहर

जिओ, एयरटेल आणि BSNLचे सर्वात महाग ब्रॉडबँड प्लान्स, मिळते 1Gbps ची स्पीड

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड, देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल अशा तीन कंपन्यांचे सर्वात महाग मिळणाऱ्या ब्रॉडबँड प्लानविषयी या ठिकाणी खास माहिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2020, 11:02 pm
नवी दिल्लीः २०२० मध्ये ऑफीस जाणाऱ्या असंख्य लोकांनी कोविड लॉकडाउनमुळे वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. यासोबतच हाय स्पीड डेटाची मागणी वाढली आहे. यामुळे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन मोठ्या नव्हे तर छोट्या शहरातही प्रसिद्ध होत आहे. वर्क फ्रॉम होम शिवाय ऑनलाइन क्लासेज करण्यापासून ते प्रसिद्ध व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आपली फेवरीट वेब सीरिज आणि मूव्हीज पाहण्यासाठी लोक ब्रॉडबँड कनेक्शन घेत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bsnl, airtel and jio


वाचाः Whatsapp वर नवे फीचर, व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल

JioFiber चे ८४९९ रुपयांचा प्लान
सर्वात महाग जिओ फायबर मध्ये युजर्संना 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळते. तसेच एका महिन्यासाठी ६६०० जीबी एफयूपी लिमिट सोबत डेटा मिळतो. प्लान सोबत फ्री व्हाइस कॉलिंग आणि ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंगचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅटफॉर्मवर अॅमेझॉन प्राइम पासून Disney+ Hotstar VIP जिओच्या प्रसिद्ध अॅप्सपर्यंत समावेश आहे.

वाचाः Airtel vs Jio vs Vi vs BSNL: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लान

Airtel Xstream Fiber चा ३४९९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या ब्रॉडबँड सर्विसचा सर्वात महाग प्लानमध्ये 1Gbps स्पीड सोबत अनलिमिटेड डेटा एका महिन्यासाठी मिळतो. दरम्यान, यावर ३.३ टीबी किंवा ३३३३ जीबी पर्यंत एफयूपी लिमिट आहे. प्लानमध्ये फ्री व्हाइस कॉलिंग सर्व नेवटर्क्सवर मिळते. तसेच ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन या प्लानमध्ये मिळते. युजर्संना एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते.

वाचाः Apple iPhone 12 च्या डिस्प्लेत हा प्रोब्लेम सुरू, युजर्स झाले चिंताग्रस्त

BSNL Broadband चा १६९९९ रुपयांचा प्लान
बीएसएमएलच्या या प्लानमध्ये 100Mbps स्पीड सोबत अनलिमिटेड डेटा मिळतो. बाकीच्या कंपन्याप्रमाणे यात ३५०० जीबीचे फेयर युजेस पॉलिसी लिमिट दिली आहे. ही लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 10Mbps होते. प्लानसोबत फ्री लँडलाइन कनेक्शन मिळते. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग केली जावू शकते.

वाचाः Whatsapp वर नवे फीचर, व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल

वाचाः वोडाफोन-आयडियाचा स्वस्त प्लान, २६९ रुपयांत ५६ दिवसांची वैधता

वाचाः सावधान! 'यू मे नो दीज पीपल' असा मेसेज फेसबुकवर दिसतो का?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज