अ‍ॅपशहर

एकाच नंबरने अनेक फोनमध्ये चालवता येणार व्हॉट्सअॅप, जबरदस्त फीचर

Whatsapp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. आता या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप युजर्संना आता एकाच नंबरने अनेक व्हॉट्सअॅप चालवता येवू शकणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2020, 6:42 pm
नवी दिल्लीः मेसेजिंग सर्विस व्हॉट्सअॅपवर सध्या युजर्संना एकाच नंबरवर एकाच फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालवता येते. परंतु, लवकरच एक जबरदस्त फीचर येत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरवर कंपनी काम करीत आहे. या फीचरच्या मदतीने एकाच नंबरवरुन अनेक डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप चालवता येणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या लिक्सच्या माहितीशिवाय WABetaInfo कडून या संबंधित डिटेल्स शेयर करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, युजर्स चार डिव्हाईसला एकाच अकाउंटवरून लिंक करु शकतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new whatsapp feature


वाचाः 48MP क्वॉड कॅमेऱ्यासह रियलमीचा फोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स
व्हॉट्सअॅपमधील होत असलेल्या बदलात आणि अपडेट्सला मॉनीटर करणारी साईट WABetaInfo कडून या फीचरची माहिती देण्यात आली आहे. या अॅपमध्ये य़ुजर्संना एकाच सेक्शनमध्ये 'Linked Devices' मिळणार आहे. यात दिसेल की युजर कोणत्या डिव्हाईसमध्ये कोणत्या नंबरवरून व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहे. यासाठी नवीन सेक्शन अॅपच्या मेन्यू मध्ये जावे लागेल. याला टॉप राईट मध्ये दिसत असलेल्या तीन ड़ॉट्सवर टॅप करावे लागेल. या ठिकाणी युजर्संना सेटिंग्स, न्यू ब्रॉडकास्ट आणि स्टार्ड मेसेजेज यासारखे पर्याय मिळतील.

वाचाः जिओचे जबरदस्त प्लान, बंपर डेटा आणि अनलिमिटेड कॉल


नवीन अडवॉन्स सर्च फीचरवर काम
नवीन सेक्शनमध्ये केवळ युजर्सला नवीन डिझाईन लिंक करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. याआधी लिंक केलेल्या डिव्हाईसमध्ये समोर येतील. तसेच टॅप स्टँप सोबत दिसेल की, त्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅपचा कधी वापर करण्यात आला होता. ते कधी पर्यंत अॅक्टिव होते. मल्टी डिव्हाईस सपोर्ट शिवाय, कंपनी अडवॉन्स सर्च मोड वर काम करीत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, अँड्रॉयड अॅप युजर्सला लवकरच एक नवीन युजर इंटरफेस पाहायला मिळू शकते.

वाचाः एअरटेलची मोठी ऑफर, रिचार्जवर फ्रीमध्ये 6GB पर्यंत डेटा

वाय फाय सिंकची गरज लागणार
WABetaInfo ला हे फीचर्स अॅपच्या अँड्रॉयड बीटा व्हर्जन 2.20.196.8 मध्ये पाहायला मिळू शकते. सध्या हे नवीन फीचर्स डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यामुळे बीटा युजर्स साठी रोल आऊट करण्यात आले नाही. गेल्या महिन्यात समोर आलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपला वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये चालवण्यासाठी वाय फाय सिंक करण्याची गरज पडू शकते. मागच्या अँड्रॉयड बीटा व्हर्जन मध्ये फेसबुकची ओनरशीप असलेल्या या अॅपची प्रायमरी रजिस्ट्रेशन दिसत होती. तसेच वायफाय च्या मदतीने लॉग इन करण्यास सांगितले होते.

वाचाः नोकियाचा अँड्रॉयड टीव्ही बॉक्स येतोय, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः Honor आणतेय दोन सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः अॅपलचे एयरपॉड्स बजेटमध्ये नाही?, ट्राय करा हे स्वस्त इयरबड्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज