अ‍ॅपशहर

नोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले

नोकिया कंपनीच्या स्मार्टफोनने जबरदस्त कमाल केली आहे. नोकियाचे स्मार्टफोन सॉफ्टवेयर सिक्योरिटी अपडेट, बिल्ड क्वॉलिटी आणि ड्यूरेबिलिटी मध्ये नंबर वन आहे. नोकिया फोनने भल्याभल्या कंपन्यांचा स्मार्टफोनला मागे टाकून नंबर वन कंपनी बनली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2020, 7:57 pm
नवी दिल्लीः नोकियाचे मोबाइल फोन ग्राहक का विकत घेतात याचे आणखी एक कारण समोर आले आहे. नुकत्याच आलेल्या काउंटरपॉइंट रिसर्चच्या अनुसार नोकियाचे स्मार्टफोन सॉफ्टवेयर सिक्योरिटी अपडेट, बिल्ड क्वॉलिटी आणि ड्यूरेबिलिटी मध्ये नंबर वन आहे. यावर्षी आलेल्या नोकियाचे सर्व स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतात. या लिस्टमध्ये नोकियानंतर वनप्लस, रियलमी, शाओमी, हुवावे, ओप्पो, लेनोवो, एलजी आणि विवोचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nokia smartphone


वाचाः iPhone युजर्संना झटका, Apps साठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे

प्रत्येक महिन्याला मिळते सिक्योरिटी पॅच
काउंटरपॉइंटच्या एका अॅनालिस्टने सांगितले की, एचएमडी ग्लोबलच्या मोबाइल फोन प्रोडक्ट लाइनला दुसऱ्या ब्रँड्स हून अधिक रॅकिंग यासाठी मिळाली. कारण, त्याच्या डिव्हाइसेजला प्रत्येक महिन्यात सिक्योरिटी पॅच मिळतो. यात नोकियानंतर वनप्लसचे नाव येते. वनप्लसच्या जवळपास ९० टक्के डिव्हाईसेजला दर महिन्याला सिक्योरिटी पॅच मिळतो.

वाचाः Airtel ने जोडले १.४४ कोटी नवी 4G यूजर्स, दर महिन्याला खर्च करताहेत 16GB डेटा

सॅमसंग, हुवावे डिव्हाइसेजला तीन महिन्यात अपडेट सिक्यारिटी पॅच देण्यात सॅमसंग आणि हुवावेचे गुण २२ आणि २९ टक्के राहिले आहे. याचाच अर्थ या दोन्ही कंपन्याच्या डिव्हाईसेजला प्रत्येक महिन्यात सिक्योरिटी पॅच अपडेट मिळतो. रियलमी आणि शाओमीच्या परफॉरमन्स सॅमसंग आणि हुवावे पेक्षा चांगला राहिला आहे. रियलमी आणि शाओमीच्या दोन तृतियांश स्मार्टफोनला मंथली सिक्योरिटी अपडेट दिले जात आहे.

वाचाः खरेदी केला ७ हजारांचा स्मार्टफोन, मिळाला १४ रुपयांचा रिन साबण

एचएमडी ग्लोबलची टेस्टिंगची पद्धत सर्वात कठीण
काउंटरपॉइंटच्या रिसर्च मध्ये म्हटले की, एचएमडी ग्लोबलची टेस्टिंगची प्रक्रिया इंडस्ट्री मध्ये सर्वत कठीण मानली जाते. काउंटरपॉइंट रिसर्चच्या असोसिएट डायरेक्टर तरुण पाठकने म्हटले की, बिल्ड क्वॉलिटी क्रायटिरियाला अनेक आधारावर चेक केले जाते. ज्यात रोबस्टनेस, फोर्स मेजरमेंट, ड्रॉप इंपैक्ट, थर्मल टेस्ट सोबत अनेक वस्तूंचा समावेश आहे.

वाचाः जगातील पहिला ब्लड सेन्सरचा फीचर फोन Pulse 1 लाँच, किंमत १९९९ ₹

वाचाः OnePlus चा स्वस्त फोन Nord N100 लाँच, किंमत २० हजारांपेक्षा कमी

वाचाः ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ८ हजार ९९९ रुपयांत

वाचाः ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत रोज ४जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज